12 वेळा महिलेकडून स्त्री बीज काढलं, 18 ते 25 हजार रुपये, मुख्य केंद्र ठाणे-नाशिक, बदलापूरमधील स
बदलापूर गर्भाशयाची अंडी विक्रीचे रॅकेट बदलापूरमधील स्त्री बीज विक्री प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. एका महिलेकडून एकदा नाही तर अनेक वेळा स्त्री बीज काढण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच एका महिलेकडून 10 ते 12 वेळेस स्त्री बीज कढल्याचे देखील तपासात (Badlapur IVF Racket) आले समोर आले आहे.
कायदेशीर रित्या एका महिलेकडून एकदाच स्त्री बीज काढण्यात येते, मात्र एकाच महिलेकडून वारंवार स्त्री बीज घेतल्यास ते बेकायदेशीर तर आहेच पण धोकादायक देखील आहे. या स्त्री बीज देणाऱ्या महिलांना पैसे किती देण्यात यायचे ते देखील आले समोर आले आहे. एका महिलेला 18 ते 25 हजार रुपये या स्त्री बीज विक्रीतून मिळायचे, अशी सूत्रांची माहिती आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर स्त्री ब्रिज तयार झाले हे सोनोग्राफीत सिध्द झाल्यानंतर बाहेरील राज्यात त्या महिलेला पाठवून, तिचे बनवत कागदपत्रे बनवून तिचे स्त्री बीज काढण्यात येऊन त्याची विक्री करण्यात यायची, असेही समोर आले आहे. यासंदर्भात अजून एका महिलेला पोलिसांनी अटक केली असून, ही महिला उल्हासनगर येथील सोनोग्राफी सेंटर मध्ये कामाला होती, स्त्री बीज तयार आहे की नाही ते हिचं महिला सोनोग्राफी करून सांगायची. या सगळ्याचं मुख्य केंद्र नाशिक शहरात आहे, तिथल्या प्रसिद्ध IVF सेंटर पर्यंत या प्रकरणाचे धागेदोर पोहोचत आहे. (Badlapur Uterine Eggs Selling Racket)
नेमकं प्रकरण काय? (Badlapur Uterine Eggs Selling Racket)
बदलापूरात स्त्री बीजाच्या अवैध विक्रीचं रॅकेट उघड झालं आहे. याप्रकारचं हे भीषण रॅकेट चक्क एका घरातून चालवलं जात होतं. सुलक्षणा गाडेकर या महिलेनं घरामध्ये स्त्री बीज वाढवणारी इंजेक्शन्स बेकायदेशीरपणे साठवून ठेवली होती, असा आरोप आहे. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून हे इंजेक्शन दिलं जात होतं. त्यानंतर गर्भाशयात स्त्री बीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना IVF सेंटरमध्ये पाठवलं जात होतं. तिथल्या डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्री बीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकानं सुलक्षणा गाडेकर यांच्या घरी धाड टाकून हे रॅकेट उघडकीस आणलं. या प्रकरणी गाडेकर यांच्यासह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे एक मोठं इंटरनॅशनल रॅकेट असण्याची शक्यता आहे.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या? (Rupali Chakankar On Badlapur Uterine Eggs Selling Racket)
बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणात सहभाग असलेल्या IVF सेंटरवर तसच सोनोग्राफी सेंटरवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिलीय. तसंच या प्रकरणात नाशिकमधील मालती IVF सेंटर ठाण्यात सुरू होतं. त्या सेंटरच्या माध्यमातून हे कृत्य सुरू असल्यासही त्यांनी सांगितलय. स्त्री बीज तस्करी प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली. या पाचही जणांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे स्वतःची ओळख लपवून स्त्रीबीजांची तस्करी केल्याचं समोर आलं आहे. तसेच हे रॅकेट बदलापूर ठाण्यापुरता मर्यादित नसून याची पाळामुळे संपूर्ण राज्यात तसच राज्याबाहेरही पसरल्याचं रूपाली चाकणकर यांनी सांगितलं. बदलापूर पोलिसांनी हे प्रकरण शोधून काढल्याबद्दल त्यांनी पोलिसांचही कौतुक केलं.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.