अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रक्कम हस्तगत
जालना : सोशल मीडियावरुन किंवा वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन तरुणाईला किंवा पुरुषांना अश्लील व्हिडिओच्या (Video) माध्यमांतून जाळ्यात फसवण्याचा नवा फंडा सध्या जोरात पाहायला मिळतो. याप्रकरणी, अनेकदा सायबर पोलिसांनी कारवाई देखील केली असून सातत्याने असे प्रकार पुढे येत आहेत. याप्रकरणी जालना (Jalna) पोलिसांनी मोठी कारवाई करत सोशल मीडिया आणि फोनवरून ओळख करून अश्लील व्हिडिओ बनवत लुटमार करणाऱ्या एका महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अडकले (क्राइम न्यूज) केली आहे.
जालन्यातील नवा मोंढा परिसरात एका तरुणाशी ओळख वाढवून त्याला एकांत ठिकाणी बोलावत आरोपी तरुणीने साथीदारांसह युवकाला मारहाण केली होती. तसेच, तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत तरुणाकडून 80 हजार रुपये देखील काढून घेण्यात आले होते. याप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा दाखल करत संपूर्ण टोळीला आज जेरबंद केलं. पकडण्यात आलेल्या टोळीप्रमुख आरोपी तरुणीवर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात अश्लील व्हिडिओ बनवून लुटमारीचे तब्बल सहा गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी याच तरुणीच्या त्रासाला कंटाळून छत्रपती संभाजीनगरमधील करमाड येथे एका तरुणाने आत्महत्या केली होती.
पोलिसांनी या टोळीकडून रोख रक्कम, मोबाईल आणि रिक्षासह एकूण 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी तरुणीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून वर्तवली जात आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे, अशी माहिती जालन्याचे डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी दिली.
संभाजीनगरमध्ये हॉटेलमध्ये घुसून मारहाण
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बजाजनगर येथील टेस्टी बिर्याणी हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास 6 ते 7 मद्यधुंद तरुणांनी धुडगूस घालत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. यावेळी हॉटेलचे मॅनेजर दीपक यांच्याशी वाद घालत त्यांना देखील मारहाण करण्यात आली. हॉटेल मालक आप्पासाहेब खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून मोठे नुकसान केले. तसेच गल्ल्यातील रोकडही काढून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. तोडफोडीदरम्यान आरोपींपैकी एक मद्यधुंद तरुण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Comments are closed.