सिया गोयलचा वकील नेमका कोण? भाऊ साहीलच्या आरोपानंतर आशुतोष श्रीवास्तव यांनी धाडली 10 कोटींच्या
केतन अग्रवाल पुणे लोहगड मृत्यू प्रकरण: पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्याप्रकरणाला आता एक वेगळेच कायदेशीर वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल (Siya Goyal) हिचे वकील असल्याचा दावा करणारे अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी आता सियाचा भाऊ साहिल गोयल याला थेट 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे. कोर्टातील नाट्यमय घडामोडींनंतर हा वाद आता चांगलाच पेटला आहे.
सोमवारी आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी कोर्टात उभे राहून सियाच्या बाजूने युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांना अद्याप सियाचे अधिकृत वकीलपत्र मिळाले नव्हते. ही बाब गोयल कुटुंबियांना आधीपासूनच खटकत होती. अखेर कोर्टासमोर बोलताना सिया गोयलने स्पष्ट केले की, “माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत.” सियाच्या या थेट खुलाशानंतर अॅड. श्रीवास्तव यांचा चांगलाच संताप झाला आणि त्यांना न्यायालयातून काढता पाय घ्यावा लागला.
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: 10 कोटींची नोटीस आणि 48 तासांचा अल्टिमेटम
या प्रकारानंतर संतप्त झालेल्या अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल गोयलवर कायदेशीर अस्त्र उपसले आहे. साहिलने आपल्यावर खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप करून व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा दावा त्यांनी केला आहे. या बदल्यात त्यांनी 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच, केलेले आरोप मागे घेऊन पुढील 48 तासांत सार्वजनिक माफी मागावी आणि भविष्यात असे आरोप न करण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी अट या नोटिशीत घालण्यात आली आहे.
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत वाढ
दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही आरोपींची 3 जुलैपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. 18 जून रोजी लोहगड किल्ल्याच्या कठड्यावरून ढकलून केतनची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली आहेत. या गुन्ह्यात सियाचा भाऊ साहिल आणि तिच्या आई-वडिलांचीही कसून चौकशी करण्यात आली आहे. आता पोलीस आरोपी सिया आणि चेतन यांच्या सोशल मीडिया खात्यांचा, व्हॉट्सॲप चॅट्सचा आणि त्यांनी भेट दिलेल्या संकेतस्थळांचा डिजिटल तपास करत आहेत, जेणेकरून भक्कम पुरावे गोळा करता येतील. आता या प्रकरणात आणखी काय खुलासे होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Comments are closed.