केबिन, 11 हजारांची पावती आणि अमावस्येला150 आलिशान गाड्या; मनोहर भोसलेच्या आश्रमात काय काय?
मनोहर मामा भोसले बातम्या: भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याचे प्रकरण ताजे असताना स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणारा आणि भविष्य बदलवण्याचे आमिष दाखवत भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा (मनोहर मामा भोसले) याला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पण मनोहर भोसले याला या आधी देखील आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कार सारखे 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आधीच्या 3 गुन्ह्यात जामीनावर असलेला मनोहर मामा पुन्हा एकदा आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत आहे. (Manohar Mama Bhosale Solapur Crime News)
बुवाबाजी प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाबा मनोहर भोसले (Manohar Bhosale Solapur) याचा आलिशान आश्रम करमाळा तालुक्यातील घोटी या ठिकाणी आहे. दर अमावस्येला याच ठिकाणी बडीमंडळी आणि राजकीय नेत्यांची गर्दी असायची. कोणाला घरच्या समस्या तर कोणाला आर्थिक समस्या कोणाला आपली भविष्य जाणून घ्यायचे असायचे, अशी सर्व बडीमंडळी या मामाच्या चरणी दाखल झालेली असायचे. मात्र घोटी आणि परिसरातील ग्रामस्थ मात्र अशा बुवाबाजी वर कधीही विश्वास ठेवून इथे येत नसल्याचे गावचे सरपंच विलास काका राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. मनोहर भोसलेची भेट घ्यायची असेल तर अकरा हजार रुपयेची पावती लागायची, अशीही माहिती समोर आली आहे. (Manohar Mama Bhosale Crime News)
आंब्याची मोठी बाग, सभा मंडपासाठी थेट राजस्थान आणि कोकणातून लाल दगड- (Manohar Mama Bhosale Crime News)
दर अमावस्येला शंभर ते दीडशे आलिशान गाड्या या माळरानावरील आलिशानाश्रमात येत असत. यामध्ये सर्वच पक्षाचे राजकीय नेते, आमदार, खासदार, बडे उद्योजक, शिक्षण सम्राट अशा अनेकांना मनोहर भोसलेने वेड लावले होते. 27 एकरावर पसरलेल्या या आलिशान आश्रमात गेल्या पाच वर्षापासून नवनवीन डेव्हलपमेंट सुरू असून आश्रमाच्या समोरच आंब्याची मोठी बाग आहे. आमच्या आश्रमाच्या सभा मंडपासाठी थेट राजस्थान आणि कोकणातून लाल दगड आणल्याचे सांगितले जात आहे. या जागेत भक्तांच्या प्रतीक्षेसाठी मोठे हॉल असून आत मामांची आलिशान केबिन आहे. (Manohar Mama Bhosale Crime News)
सध्या आश्रमात मनोहर मामांचा सेवकवर्ग- (Manohar Mama Bhosale Crime News)
संपूर्ण आश्रमाला कंपाऊंड करण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. सध्या मनोहर मामाच्या या आश्रमात कालपासून पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. सध्या पोलीस बाहेरच्या कोणालाही आश्रमात सोडत नसून आश्रमातूनही कोणाला बाहेर जाऊ दिले जात नाही. त्यामुळे सध्या आश्रमात मनोहर मामांचा सेवकवर्ग असून बाहेरचा कोणीही सध्या आश्रमात जाऊ शकत नाही. सोलापूर पोलिसांनी भोंदूगिरीचा विरोधात कारवाईला सुरुवात केली, असून सध्या मनोहर भोसले हे पोलिसांच्या रडारवर आहेत. (Manohar Mama Bhosale Crime News)
कोण आहे मनोहर मामा? (Who Is Manohar Mama Bhosale)
- इंदापूर तालुक्यातील लारसुणे गावातला मूळचा रहिवासी
- डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता
- एक दिवस तो अचानक गायब झाला आणि काही वर्षानंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगितले
- करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात त्याने स्वतःचा मठ थाटला होता
- साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली
- अनेक मोठ्या नेत्यासोबत देखील मनोहर मामा याचे फोटो आहेत.
- अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मामाच्या सल्ल्यासाठी गर्दी करायचे अशी चर्चा आहे.
- या आधी त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणात सोलापुरातील करमाळा पोलिसात गुन्हा दाखल आहे.
- तसेच कर्करोग बरा करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीत तर मणक्याचे आजार बरे करतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा नोंद आहे.
- 2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील त्याने आपली भोंदूगिरी सुरूच ठेवली होती.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.