अनंत गर्जेंच्या घरातून फॉरेन्सिक सॅम्पल गोळा केले, फास घेतलेल्या पंख्याची उंची मोजली, काय घडलं?


अनंत गर्जे आणि गौरी गर्जे गुन्हा: राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे खासगी स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे  यांनी शनिवारी मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती. गौरी गर्जे (Gauri Palve Garje) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असे सांगितले जात असले तरी त्यांच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर वरळी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. गौरी पालवे यांचे पती अनंत गर्जे यांना रविवारी रात्री 1 वाजता अटक करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी सोमवारी सकाळी अनंत गर्जे (Anant Garje) यांचा सविस्तर जबाब नोंदवला. अनंत गर्जे यांनी आपण इमारतीच्या रेफ्यूजी एरियातून  31 व्या मजल्यावरुन 30व्या मजल्यावरील खिडकीत गेल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर खिडकीतून मला गौरीचा लटकलेला मृतदेह दिसला, असेदेखील ते म्हणाले होते. या अनुषंगाने आता मुंबईत पोलिसांचा तपास सुरु आहे. त्यासाठी सोमवारी सायन रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि तज्ञ डॉक्टर राजेश ढेरे यांच्या नेतृत्त्वाखाली एक फॉरेन्सिक पथक अनंत गर्जे राहत असलेल्या वरळी येथील घरी गेले होते. (Mumbai crime news)

फॉरेन्सिक पथकाने अंनंत गर्जे यांच्या घराची कसून तपासणी केली आहे. गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, यादृष्टीने घरात तपास करण्यात आला. डॉ. राजेश ढेरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही गौरी पालवे यांनी आत्महत्या केलेल्या घटनास्थळाची पाहणी केली. आत्महत्येची किती शक्यता आहे, याचा तपास केला. गौरी पालवे यांचा मृतदेह ज्या पंख्याला लटकलेला होता त्या सिलिंग पंख्याची उंची आम्ही तपासली. हा पंखा किती वजन घेऊ शकते, हेदेखील आम्ही तपासले. आम्ही आता प्राथमिक अहवाल पोलिसांना देणार आहोत. मात्र, हा मृत्यू अनैसर्गिक आहे, असे डॉ. राजेश ढेरे यांनी सांगितले.

आम्ही तपासाच्यादृष्टीने घरातून आवश्यक असलेले सॅम्पल्स गोळा केले आहेत. हे सगळे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. गौरी पालवे गर्जे यांचा मृत्यू गळा आवळून झाला की नाही, याबाबत पोलिसांना विचारण्यात आले. यावर डॉक्टरांनी सांगितले की, गौरी पालवे यांचा मृत्यूचे प्राथमिक कारण ‘लिगेचर कम्प्लेशन ऑफ नेक’, असे आहे. आता आम्ही पोलीस ठाण्यात चाललो आहोत. तिकडे आम्ही पोलिसांना याबाबत माहिती देऊ, असे डॉक्टरांनी सांगितले.

आणखी वाचा

मुलीच्या अंत्यसंस्काराला गौरीचे वडील पोलिसांसमोर ओक्साबोक्सी रडले, म्हणाले, ‘तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका’

आणखी वाचा

Comments are closed.