मुंबई विमानतळावर 5 कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला बेड्या; संजय राऊतांचा रवीं
मुंबई क्राईम न्यूज: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. तब्बल 5 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या सोने तस्करी प्रकरणात भाजपच्या कामगार संघटनेचा चिटणीस अजित आचरेकर (Ajit Acharekar) याच्यासह 5 जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत.
Mumbai Crime News: DRI कडून 5 कोटींचे सोने जप्त
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डीआरआयच्या (DRI) पथकाला मुंबई विमानतळावरून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे काल पहाटे सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास पथकाने विमानतळावर सापळा रचून ही मोठी कारवाई केली. या छाप्यात 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने आणि इतर मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे. हे सोने तस्करीचे कोणतेही आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का, तसेच या प्रकरणात इतर कोणत्या प्रभावशाली घटकांचा किंवा व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सध्या यंत्रणांकडून सुरू आहे.
Mumbai Crime News: अटक करण्यात आलेला अजित आचरेकर कोण आहे?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अटक करण्यात आलेला मुख्य संशयित अजित आचरेकर हा भाजप कामगार संघटनेचा चिटणीस आहे. काही महिन्यांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याने भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. पक्षाकडून त्याला कामगार संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याचा दावाही केला जात आहे.
Mumbai Crime News: संजय राऊत यांचा गंभीर आरोप
या अटक प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी एक फोटो शेअर करत भाजपवर आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे वागणे, बोलणे, डोलणे आणि चालणे राज्याच्या सामाजिक आणि राजकीय संस्कृतीला कधीच शोभणारे नव्हते. कोकणात प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पैशाचा अतिरेकी वापर केला. जिल्हा बँक निवडणूकही याच पद्धतीने ताब्यात घेतली. यांच्याकडे इतका पैसा येतो कुठून? हा प्रश्न अनेकांना पडला होता. याचे उत्तर काल रात्री मिळालं.
चव्हाण हे मधल्या काळात अचानक मुंबई विमानतळावर कामगार संघटनेच्या कामात घुसले. त्यांनी इतर संघटना फोडून विमानतळावर नियंत्रण मिळवले. गुंडांच्या टोळ्या उभ्या केल्या व पोसल्या आणि आता त्याच लोकांना gold smuggling प्रकरणात DRI ने अटक केली आहे. हे प्रकरण गंभीर आहे. याच्या खोलात जाऊन चौकशी केली तर भाजपा पैसा कुठून कमावतो, हे उघड होईल. खालच्या फोटोत भाजपा अध्यक्ष ज्यांच्याशी हातमिळवणी करत आहेत, त्यांना DRI ने अटक केली आहे. महाराष्ट्र या लोकांनी नासवलं आहे. फडणवीस, आता तरी गंभीर व्हा, असे त्यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणावर भाजप किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून काय स्पष्टीकरण येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण
यांची वागणे , बोलणे ,डोलणे आणि चालणे राज्याच्या सामाजिक आणि राजकीय संस्कृतीला कधीच शोभणारे नव्हते.
कोकणात प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पैशाचा अतिरेकी वापर केला. जिल्हा बँक निवडणूकही याच पद्धतीने ताब्यात घेतली.
यांच्याकडे इतका पैसा येतो कुठून?… pic.twitter.com/bUYrrVq2Lk— संजय राऊत (@rautsanjay61) ७ जून २०२६
आणखी वाचा
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!
Comments are closed.