शौचालयात दिसला नवजात बाळाचा हात… पुढचं दृश्य पाहून सर्वच हादरले; मुंबईच्या कूपर रुग्णालयातील

मुंबई क्राईम न्यूज: मुंबईतील विलेपार्ले येथील महापालिकेच्या कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या तळमजल्यावरील ओपीडी (OPD) परिसराजवळ असलेल्या शौचालयात एका नवजात मृत बालकाचा मृतदेह आढळून आल्याने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून मानवतेला काळीमा फासणाऱ्या या कृत्यामागे नक्की कोण आहे, याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे.

Mumbai Crime News: असा उघडकीस आला प्रकार

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कूपर रुग्णालयात काल सकाळी नेहमीप्रमाणे रुग्णांची मोठी गर्दी होती. तळमजल्यावरील ओपीडीजवळील शौचालयात एक महिला गेली असता, तिला कमोडमध्ये नवजात बालकाचा हात बाहेर आलेला दिसला. हा अंगावर काटा आणणारा प्रकार पाहताच त्या महिलेने आरडाओरडा केला. यामुळे रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तात्काळ शौचालयाकडे धाव घेतली. विहिरी किंवा कचराकुंडीत नवजात अर्भक फेकल्याच्या घटना अनेकदा ऐकायला मिळतात, मात्र रुग्णालयाच्याच शौचालयात असा प्रकार घडल्याने रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

Mumbai Crime News: सीसीटीव्हीच्या मदतीने शोध सुरू

या घटनेची माहिती मिळताच कूपर रुग्णालय प्रशासनाने तात्काळ जुहू पोलीस ठाण्यात (Juhu Police Station) तक्रार दाखल केली. जुहू पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व तपास सुरू केला आहे. हे नवजात मृत बालक शौचालयात कोणी आणि कसे आणून टाकले, याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज (CCTV Footage) ताब्यात घेतले आहे. तसेच काल ओपीडी परिसरात कोणकोणत्या संशयित महिला किंवा व्यक्ती फिरत होत्या, याची चौकशी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Crime news Samruddhi Mahamarg: बापाने आईला संपवलं, तीन निरागस चिमुरड्यांना काहीच समजलं नाही, पोलीस स्टेशनमध्ये येताच ब्लँकेटवर अंग टाकून झोपी गेले

Jalgaon Crime News: सोनोग्राफी रिपोर्टवरून वाद, सासू अन् पतीने अंध माय-लेकाला विहिरीत ढकललं; साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; जळगाव हादरलं!

Comments are closed.