मालाड स्टेशनवर प्राध्यापकाला संपवलं, हत्याराबाबत पोलिसांकडून महत्त्वाची अपडेट, म्हणाले, हिरेजडि
मालाड रेल्वे स्टेशन हत्या: मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी आलोक सिंह (वय 31) या महाविद्यालयातील प्राध्यापकाची पोटात धारदार शस्त्र खुपसून हत्या (Murder news) करण्यात आली. ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्याच्या कारणावरुन आलोक सिंह यांचे ओंकार एकनाथ शिंदे (वय 27) या तरुणाशी कडाक्याचे भांडण झाले होते. हे भांडण विकोपाला गेले आणि ओंकार शिंदे (Onkar Shinde) याने आलोक सिंह यांच्या पोटात धारदार शस्त्राने वार केला होता. त्यामुळे आलोक सिंह यांच्या पोटातून प्रचंड रक्तस्राव झाला होता आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला ओंकार शिंदे याने आलोक सिंह (Alok Singh) यांच्या पोटात चाकू खुपसल्याचे सांगितले जात होते. मात्र, रेल्वे पोलिसांनी ओंकार शिंदे याला 12 तासांच्या शोध मोहीमेनंतर मालाड स्थानकातून ताब्यात घेतले होते. त्याला बोरिवली येथील रेल्वे पोलीस मुख्यालयात आणून त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी एक महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. ओंकार शिंदे याने आलोक सिंह यांच्या पोटात चाकू नव्हे तर हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा चिमटा खुपसला होता. (Mumbai Crime news)
आरोपी ओंकार शिंदे हा मालाडच्या कुरार व्हिलेज येथील रहिवासी आहे. तो दक्षिण मुंबईतील खेतवाडी परिसरात असणाऱ्या एका मेटलच्या कारखान्यात कामाला आहे. काल भांडणावेळी ओंकार शिंदे याचा राग विकोपाला गेला आणि त्याने त्याच्याकडील चिमटा आलोक सिंह यांच्या पोटात घुसवला. त्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन ओंकार शिंदे तिथून पळून गेला. त्याने आलोक सिंह याला मारण्यासाठी वापरलेला चिमटाही फेकून दिला. रेल्वे पोलीस सध्या हा चिमटा शोधत आहेत.
काल संध्याकाळी बोरिवली लोकलमधून येत असताना मालाड स्थानकावर उतरत असताना ओमकार शिंदे यांच्यासमोर उभे असलेल्या आलोक सिंह यांच्याशी त्याचा वाद झाला. आलोक सिंग यांना पुढे सरकण्यासाठी आरोपी ओंकार शिंदे ढकलत होता, पुढे महिला उभी असल्याने आलोक सिंग यांनी धक्का मारू नको, असे म्हटले. या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि उतरतानाच खिशात असलेल्या चिमट्याने आरोपीने आलोक सिंग यांच्या पोटात वार केला. सीसीटीव्हीतील दृश्यानुसार ओंकार शिंदे हा फक्त एकच वार करुन पळून गेला. मात्र, चिमटा टोकदार असल्याने आलोक यांना गंभीर इजा झाली आणि झालेल्या रक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झाला. आरोपी ओमकार शिंदेला सध्या अटक करण्यात आली असून पोलीस कारवाई करत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=dgvfkpLSdgE
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.