बिर्याणी, कलिंगड खाल्ले, दुसऱ्या दिवशी भयंकर घडले; एकापाठोपाठ 4 जणांचा मृत्यू, मुंबईतील हादरवणा

मुंबई न्यूज मुंबई : दक्षिण मुंबईमधील पायधूनी परिसरातील एक हादरवणारी घटना (pydhonie family news) समोर आली आहे. पायधूनी परिसरातील घाटी गल्ली येथील मुघल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अब्दुल्ला डोकाडिया (40), नसरीन डोकाडिया (35) आणि त्यांच्या मुली आयशा (16) व झैनब (13) अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.

मृत्यू आधी चारही जणांनी नातेवाईकांसोबत रात्री 10.30 वाजता बिर्याणी खाल्ल्यानंतर, रात्री 1 ते 1.30 च्या सुमारास कलिंगड खाल्ले होते. पोलीस आणि महापालिका आरोग्य अधिकारी या घटनेचा सखोल तपास करत असून, अन्नाचा नमुना फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनूसार, विषबाधा झाल्यामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. (four person died same family in pydhonie)

नेमकं काय घडलं? (Mumbai News)

डोकाडिया कुटुंबीयांनी शनिवारी रात्री कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर रविवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डोकाडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. यानंतर चौघांनाही तात्काळ जेजे रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर काही वेळात पालकांचाही मृत्यू झाला. सदर घटनेमुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईच्या मालाडमध्येही धक्कादायक घटना- (Mumbai Malad Crime News)

ल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला अटक (Mumbai Crime News) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद उपेश अनवर अंसारी असून तो 24 वर्षांचा आहे आणि मालाड मालवणीचा रहिवासी आहे.पोलिसांनी सांगितले की, मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने ऑनलाइन साडीची ऑर्डर दिली होती. जेव्हा डिलिव्हरी बॉय साडी घेऊन त्या महिलेच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याने सांगितले की, त्याच्याकडे सुट्टे पैसे नाहीत. माझ्यासोबत कोणालातरी पाठवा मी पैसे देतो. मग डिलिव्हरी बॉयने सदर मुलीला सुट्टे पैसे देण्यासाठी खाली बोलावले. आणि ‘पेमेंट डिटेल्स’ दाखवण्याच्या बहाण्याने, त्याने तिला त्याच्या मोबाईल फोनवर अश्लील व्हिडीओ दाखवायला सुरुवात केली. जेव्हा ती मुलगी ओरडायला लागली, त्यानंतर आरोपी फरार झाला. घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी आरोपीला अटक केली.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Mumbai News: पहिले बिर्याणी, मग कलिंगड खाल्ले…, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; आख्खं कुटुंब एकाचवेळी संपलं, नेमकं रहस्य काय?

आणखी वाचा

Comments are closed.