नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

नागपूर क्राइम न्यूज: नागपुरातील कुख्यात गुन्हेगार असलेल्या राजा गौस (Raja Gaus) याने पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे (गजा दयनीय) याच्यासोबत एक इंस्टाग्रामवर रिल्स शेयर केली होती. या रिल्स मध्ये ‘मै हु नागपूर का किंग’ अशा पद्धतीचा उल्लेख करत एक प्रकारे पोलिसांनाच आव्हान दिलं होतं. त्याच्यासोबत आणखी दोन ते तीन गुन्हेगार होते. त्यांनीही रिल्स अपलोड केली होती. या प्रकरणी आता नागपूर सायबर (Nagpur Cyber Police) पोलिसांकडून दखल घेण्यात आली असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. तर या प्रकरणी गजा मारणेला ताब्यात घेण्यासाठी नागपूर पोलीस पुणे पोलिसांच्या संपर्कात असल्याची ही माहिती पुढे आली आहे.

पुण्यातील गजा मारणे हा नागपूरवरून पुढे जाणार होता. दरम्यान, त्याने नागपुरातील इतर गुन्हेगारांसोबत थांबून भेट घेतली व जेवणही केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर राजा गौस यांने गजा मारणे सोबतची ही रिल्स पोस्ट केलीय. या पोस्टच्या आधारे अशा पद्धतीने दहशत पसरवत असल्याचा ठपका ठेवत नागपूर सायबर पोलिसांनी या रिल प्रकरणावरून तीन लोकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे. यात मुख्य आरोपी राजा गौस याला रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याचा मोबाईल जप्त करून कारवाई केल्याची माहिती ही पुढे आली आहे. त्यामुळे आता गजा मारणे याला या प्रकरणात नागपूर पोलीस बोलावतात का? आणि काही कारवाई करतात  का? याकडेही लक्ष लागले आहे.

इंस्टाग्रामकडे डिलीट केलेल्या रिल्सची मागणी

पुढे आलेल्या माहितीनुसार, यात रिल्स अपलोड करणारा मुख्य आरोपी हा नागपुरातील असून राजा गौस खान याच्यासह अन्य दोन ते तीन जणांनी त्या रिल्स अपलोड केल्या होत्या. मात्र पोलिसांच्या कारवाई होणार अशी माहिती मिळत असल्याने त्यांनी त्या डिलीट केल्या आहेत. या संदर्भात सायबर पोलीस विभागाने इंस्टाग्रामकडे डिलीट केलेल्या रिल्सची मागणी केली आहे. त्यानंतर या बाबतची माहिती मिळताच पुढील तपास केल्या जाणार असल्याची माहिती नागपूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिली आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.