नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात परदेशातून फंडिंग? आता थेट NIA करणार तपास, राष्ट्रीय महिला आयोगाची ट
नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील (Nashik) एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करण्याचा जो खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता, त्याला आता राष्ट्रीय वळण मिळाले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संभाव्य दहशतवादी कनेक्शन पाहता, राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
Nashik Crime News: NIA कडे कागदपत्रे सुपूर्द
नाशिक पोलिसांनी (Nashik Police) या प्रकरणातील तपासाची सर्व महत्त्वाची कागदपत्रे आता NIA कडे सोपवली आहेत. या प्रकरणामागे केवळ धर्मांतर नसून काही देशविघातक शक्तींचा हात आहे का? याचा तपास केला जाणार आहे. आरोपींना पैशांचा पुरवठा नेमका कुठून होत होता? परदेशातून या रॅकेटला आर्थिक मदत मिळत होती का? या ‘सोर्स’चा शोध NIA घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणाशी या प्रकरणाचे काही धागेदोरे जुळतात का? याचीही पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे.
Nashik Crime News: राष्ट्रीय महिला आयोगाची ‘स्पेशल कमिटी’ मैदानात
या प्रकरणाची दखल घेत आज राष्ट्रीय महिला आयोगाचे (NCW) उच्चस्तरीय पथक नाशिकमध्ये दाखल होत आहे. हे पथक थेट कंपनीच्या आवारात जाणून पाहणी करणार आहेत.या पथकात निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, हरियाणाचे निवृत्त डीआयजी बी. के. सिन्हा, सुप्रीम कोर्टाच्या ॲडव्होकेट मोनिका अरोरा यांचा समावेश आहे. हे पथक केवळ पाहणीच करणार नाही, तर पीडित महिलांशी सविस्तर चर्चा करून आपला गोपनीय अहवाल आयोगाला सादर करणार आहे.
Nashik Crime News: नेमकं प्रकरण काय?
नाशिकमधील एका कॉर्पोरेट कंपनीत हिंदू मुलींना टार्गेट करणे, त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे आणि विरोध केल्यास लैंगिक व मानसिक छळ करणे, असे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. हे सर्व कृत्य एका विशिष्ट व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नियंत्रित केले जात होते. या प्रकरणाची मुख्य सूत्रधार निदा खान गेल्या 20 दिवसांपासून फरार असून, पोलीस तिच्या शोधासाठी तीन पथके तैनात केली आहेत. आतापर्यंत कंपनीच्या HR अश्विनी चैनानीसह 7 जणांना अटक करण्यात आली आहे.
Nashik Crime News: 150 कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’
तपासाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाने कडक पावले उचलली आहेत. कंपनीत सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अंतर्गत ‘झाडाझडती’ सुरू असून, 150 कर्मचाऱ्यांना Work From Home देण्यात आले आहे. कामगार उपायुक्त कार्यालयाने कंपनीचे ‘शॉप ॲक्ट लायसन्स’ आणि इतर तांत्रिक कागदपत्रे जप्त केली आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.