घरी पाहुणा आला, पती नाईट शिफ्टला गेला, विवाहितेचे हात बांधून अत्याचार, नराधमाला पाठलाग करुन डों
नाशिक क्राईम न्यूज : विवाहितेवर अत्याचार करून फरार झालेल्या संशयित आरोपीला अखेर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातून अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने कन्नड परिसरात ही कारवाई करत हर्षल रमेश परदेशी (वय 19) (Harshal Pardeshi) याला ताब्यात घेतले. (Nashik Crime News)
या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार आरोपी हर्षल परदेशी हा तिच्या घरी पाहुणा म्हणून आला होता. त्या रात्री महिलेचा पती रात्रपाळीसाठी बाहेर गेला होता. याच संधीचा फायदा घेत आरोपीने महिलेचे हात ओढणीने बांधून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. याप्रकरणी नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी दोन विशेष पथके तयार केली होती. गुन्हे शाखा युनिट-2 चे पथक त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. तपासादरम्यान आरोपी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
Nashik Crime News: नराधमाला पाठलाग करुन डोंगरात पकडलं
पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हार न मानता डोंगराळ भागात जवळपास दोन किलोमीटर पाठलाग करत अखेर त्याला पकडले आणि बेड्या ठोकल्या. दरम्यान, आरोपीला अटक केल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत जलद कारवाई केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
Nashik Crime News: आमिष दाखवून अत्याचार, नाशिकमधील दुसरी घटना
दरम्यान, विवाहाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात परळी (जि. बीड) येथील एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश महादेव फड (35, रा. मांडवा काळभैरव मंदिर, ता. परळी, जि. बीड) असे संशयिताचे नाव असून त्याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावली होती. 19 जून 2022 पासून मार्च 2026 पर्यंत संशयिताने नाशिकसह ठाणे, शिर्डी आणि कुर्ला येथील विविध ठिकाणी पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र जेव्हा पीडितेने विवाहाबाबत विचारणा केली तेव्हा संशयिताने लग्नास नकार दिला. यावरून उभयतांमध्ये वाद झाला असता संशयिताने पीडितेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.