बसमध्ये तिकीटवरून किरकोळ वाद विकोपाला; कंडक्टरनं प्रवाश्याच्या डोक्यात तिकीट मशीन मारली अन्..;
परभणी क्राईम न्यूज : माळेगाव ते गंगाखेड बसमध्ये तिकीट काढण्यावरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात जोरदार वाद (Parbhani Crime News) झाला. याच वादानंतर दोघात मारहाण ही झाली. यात प्रवाशाकडून मारहाण झाल्यानंतर कंडक्टरने चक्क तिकीट मशीनच प्रवाश्याला मारले, ज्यात प्रवाश्याचा डोक्याला दुखापत (Crime News) झाली आहे. दरम्यान कंडक्टर किरण वाघमारे यांनी गंगाखेड पोघेतलास ठाण्यात त्यांना बंदरवाडी व चाटोरी येथे मारहाण करण्यात आल्याबाबत फिर्याद देण्यात आली. ज्यानंतर बालाजी चव्हाण, विशाल चव्हाण, परमेश्वर चव्हाण, दीपक मस्के या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता कपाळामधून रक्त निघत असलेले प्रवाशीही कंडक्टर विरोधात गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Beed Crime : धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करणाऱ्या 30 जणांविरोधात गुन्हा दाखल
बीड शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करणाऱ्या 30 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरातील गोरे वस्ती परिसरात उघड्या विद्युत रोहित्राला चिकटून एका पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याच घटनेत दोशींवर कारवाई करण्याची मागणी करत दीड तास महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
परंतु सार्वजनिक रस्ता बंद करून रहदारीस अडथळा निर्माण करणे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मयत मुलाच्या नातेवाईकांसह आंदोलकांवर गुन्हा नोंदविण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला होता. मात्र न्यायासाठी करण्यात आलेल्या आंदोलकांवरच गुन्हे दाखल केल्याने संताप व्यक्त केला जातोय.
Beed Crime: रेशन दुकानदाराकडून कार्डधारकास अरेरावी, तहसीलदारांना निवेदन देत केली चौकशीची मागणी
बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील राशन दुकानदार आणि महेश चांदणे नामक राशन धारकाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. माझ्या वेळेनुसारच मी राशन वाटणार, मी राशन देत नाही, तुला काय करायचे आहे ते कर, तू कार्डधारक असला म्हणजे माझा मालक नाहीस, असे म्हणत राशन दुकानदार या राशन धारकाला धमकावत असल्याचे या कॉल रेकॉर्डिंगमधून स्पष्ट होत आहे. दरम्यान ही कॉल रेकॉर्डिंग सोशल माध्यमांवर व्हायरल झाली असून राशन दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी धारूर तहसीलदारांकडे निवेदनातुन करण्यात आली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.