सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक, RTO चलानच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाचे 2 लाख 50 हजार लुबाडले
मुंबई क्राईम न्यूज : सायबर गुन्हेगारांकडून मुंबई शहरात आरटीओ चलान (RTO Chalan) नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरु आहे. जोगेश्वरी पश्चिम ओशिवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्येष्ठ नागरिकाची आरटीओ चलानच्या नावाखाली 2 लाख 50 हजार रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. ऑनलाईन फसवणूक झालेली सर्व रक्कम Golden Hour मध्ये परत मिळवण्याची ओशिवरा पोलीस ठाण्याचे सायबर सेलने कौशल्यपूर्ण कामगीरी केली आहे. दरम्यान, सातत्यानं अशा घटना घडत असल्यानं नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
नेमकी कशी झाली फसवणूक
ज्येष्ठ नागरिकांची RTO Chalan च्या नावाखाली 2 लाख 50 हजार रुपयाची फसवणूक झाली आहे. 71 वर्षीय जेष्ठ नागरिक यांचा एच डी एफ सी बँकेचे क्रेडिट कार्ड वर फिर्यादी हे त्यांच्या राहते घरी असताना त्यांच्या व्हाट्सअप वर त्यांच्या गाडीवर दोन हजार रुपयाचे फाईन व RTO Chalan अशी लिंग असलेला मेसेज प्राप्त झाला. तक्रारदारान सदरचा फाईंड भरण्याकरता RTO Chalan लिंक ओपन करुन त्यामध्ये गाडीची माहिती व क्रेडिट कार्डची डिटेल्स भरली असता काही वेळात त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डमधून 2 लाख 50 हजार रुपये वजा झाल्याचा मेसेज प्राप्त झाला. सदरचा मेसेज पाहता त्यांना सदरचे RTO Chalan चा मेसेज फसवणूक त्याद्वारे त्यांचे ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ ओशिवरा पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यास आले. ओशिवरा पोलिसांनी तक्रार दाखल करुन गोल्डन हावरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचे पैसे पुन्हा परत काढून दिले.
महत्वाच्या बातम्या:
Court on Online Fraud Case: ऑनलाईन फसवणूक प्रकरणी ग्राहकाने स्वतः ओटीपी दिल्यास बँक निर्दोष; ग्राहक न्यायालयाचा निर्वाळा
आणखी वाचा
Comments are closed.