‘…बस नेक्स्ट मस्त होना चाहीये!’ गळ्यात मंगळसूत्र अन् सगळ्या पोस्ट S साठीच, पूजाचा आणखी एक चे

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई येथील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत आलं आहे. एका नर्तिकेच्या नादी लागून गोविंद बर्गे यांनी डोक्यात गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत, यामध्ये नवनवीन खुलासे समोर येत आहेत. नर्तिका पूजा गायकवाड सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. तिचं सोशल मिडीया आणि तिचे रील देखील आता चर्चेत आले आहेत, त्याचबरोबर आता तिचं आणखी एक इंन्स्टाग्राम अकाऊंट देखील समोर आलं आहे. यामध्ये चक्क तिने तिच्या सगळ्या व्हिडीओंमध्ये गळ्यात मंगळसूत्र आणि S नावाच्या व्यक्तीसाठी पोस्ट केल्याचं दिसून आलं आहे. आता हा एस नावाचा व्यक्ती कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.

पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील वैराग इथं एका कला केंद्रात काम करते. याच कला केंद्रामध्ये गेवराईचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय ३४) आणि पूजाची भेट झाली. गोविंद बर्गे तिच्या प्रेमात पडले आणि फसले.  तिच्या अनेक मागण्या त्यांनी पूर्ण केल्या, फोन, सोनं, जमिन, प्लॉट, भावाचा गाडी हे सगळं त्यांनी दिलं, पण जेव्हा तिने घराची मागणी केली, आणि बर्गेंनी हे घर नाही पण मी तुला दुसरं घर बांधून देतो,असं म्हटलं तेव्हा तिने ब्लॅकमेल केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांना केला. पण आता पूजा गायकवाडचं एक इंस्टाग्राम अकाऊंट समोर आलं आहे. यामध्ये तिचे काही व्हिडीओ नेहमीसारखे नाचताना दिसून येत आहे. पण तिने गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे, त्यामुळे आता पूजाचं लग्न झालं होतं का की तिने फक्त मंगळसूत्र घालून रील शुट केली अशी चर्चा आहे, तर तिच्या आधीच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये शेअर केलेल्या रीलच्या कॅप्शनमध्ये तिने S असं लिहलं आहे, त्यामुळे ती आणखी कोणाला फसवत होती का? हा S कोण अशी चर्चा आहे.


गळ्यात मंगळसूत्र आणि S नावाची पोस्ट

या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या सगळ्याच व्हिडीओमध्ये मंगळसूत्र घातलं आहे. वेगवेगळ्या गाण्यावर तिचे हे व्हिडीओ आहे. तिने इंस्टाग्रामवर अनेक पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने S नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला. बस तुम्हारे हो गये, S अशा नावाने या पोस्ट आहे. त्यामुळे S नावाची व्यक्ती कोण आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे. पण हे तिचं जुनं इंन्स्टाग्राम अकाऊंट असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली, तेव्हा तिचं दुसरं इंस्टाग्राम अकाऊंट असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

कोण आहे पूजा गायकवाड?

पूजा गायकवाड ही कला केंद्रात नर्तिका असून ती 21 वर्षांची आहे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख झाली होती. कालांतराने पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले. पूजा गायकवाड ही इन्स्टाग्रामवर तिच्या नाचण्याचे अनेक रिल्स शेअर करायची. गोविंद बर्गे यांनी प्रेमप्रकरण सुरु असताना पूजा गायकवाड हिला पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने दिले होते. गेल्या काही दिवसांपासून पूजा गायकवाड ही गोविंद बर्गे यांच्याशी बोलत नव्हती. त्यामुळे गोविंद बर्गे नैराश्यात होते. पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्याकडे गेवराईतील बंगला आपल्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर जमीन करा, अशी मागणी केली होती.

नेमकं प्रकरण काय?

गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता. ते अनेक कला केंद्रात जायचे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या नावावरही काही जमीन केली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखावले गेले होते. प्रेमात फसवणूक झाल्याने ते नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले होते.

गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते. मात्र, ती त्यांचा फोन उचलत नव्हती, त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासुरे येथील घरी आले होते. याठिकाणी दोघांमध्ये नेमके काय झाले, हे माहिती नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला. कारचा दरवाजा लॉक करण्यात आला होता. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता. त्यांनी डोक्याच्या उजव्या भागात कानशिलात गोळी झाडून घेतल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. गोविंद बर्गे यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरुन डाव्या बाजूने बाहेर पडली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.


आणखी वाचा

Comments are closed.