अंजना कृष्णा प्रकरणावर दिलगिरी व्यक्त करूनही मित्रपक्षाकडून अजितदादांची जाणीवपूर्वक मीडिया ट्रा

सोलापूर: सोलापूरच्या माढा तालुक्यातील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणाने राज्यातील राजकारण तापवलं आहे. काही दिवसांपूर्वी महिला आयपीएस अधिकाऱ्यांशी केलेल्या कठोर भाषेतील संभाषणाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता याच व्हिडिओवरून विरोधक आक्रमक झाले असून उपमुख्यमंत्री पवारांना कठोर शब्दांत धारेवर धरले जात आहे. दरम्यान, या वादग्रस्त प्रकरणात अजित पवारांच्या बचावासाठी पुतणे रोहित पवार उभे ठाकल्याचं स्पष्ट दिसत आहे.  रोहित पवारांनी आपल्या सोशल मिडीयावरती एक पोस्ट शेअर करत यावरती भाष्य केलं आहे.

काकांच्या मदतीला पुतण्याला धावला

उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी आमदार रोहित पवारांनी आपल्या सोशल मिडीयावरती एक पोस्ट शेअर केली आहे. कुर्डु प्रकरणात अजित पवारांचा केवळ हिंदी भाषेमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे घोळ झाला. अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त करून देखील जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल मित्रपक्षाकडून सुरू असल्याचा दावा  रोहित पवारांनी केला आहे. पक्षातील दोन आणि तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांकडून सध्या राष्ट्रवादीच्या मित्रपक्षाला साजेशी भूमिका घेतली जात असून स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या केल्या जात असल्याचा आरोप देखील यावेळी रोहित पवारांनी केला आहे. पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांमुळे आमदार सोबत असून देखील अजित पवारांच सर्वकाही आलबेल आहे असं नाही, असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला आहे.

सोशल मिडीया पोस्टमध्ये काय म्हटलंय?

कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्याठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही जाणूनबुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की !  मित्रपक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील!

राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या दोन तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे? असो पक्षात “चहापेक्षा किटली गरम असणारे” एक दोन सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्वकाही आलबेल असतेच असे नाही, याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला यानिमित्ताने आलाच असेल.

नेमकं प्रकरण काय?

माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो…मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना..असे रागावून अजित पवार बोलले आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला. त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या…यात अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून…माझा फोन आलाय…तहसीलदारांना सांगा असे पवार सांगताना दिसतात.

कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा? (Who is IPS Anjana Krishna?)

1. आयपीएस अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रममधल्या

2. 2023 मध्ये यूपीएससी 355 रँकने उत्तीर्ण, आयपीएस केडर

3. सुरुवातीला होम केडर, त्रिवेंद्रममध्ये एसीपीची जबाबदारी

4. मग महाराष्ट्रसान्ना सोलापूर ग्रामीण पोलिसात कार्यरत

5. प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी

6. अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख निर्माण

7. करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका

8. दोन दिवसांपूर्वी अवैध मुरूम उपसा सुरू असताना माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाई

9. याच कारवाईसंदर्भात अजित पवारांशी बोलताना ठाम भूमिका

आणखी वाचा

Comments are closed.