अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक
मुंबई : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आज पहिल्यांदाच सोशल मीडियातून कोट्यवधी फॉलोअर्स बनवणाऱ्या झुरळ जनता पार्टी (CJP) आज रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. दिल्लीतील जंतरमंतरवर मोठ्या प्रमाणात तरुणाई शासनाविरुद्ध घोषणाबाजी करत एकत्र जमली होती. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी अमेरिकेतून आज दिल्लीत आगमन करताच आंदोलन करत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विमानतळातून बाहेर येतानाच हाती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्राचे पुस्तक घेऊन अभिजीत दीपकेंनी आंदोलनात सहभाग घेतला. त्यावेळी, मोठ्या संख्येने तरुणाई त्यांच्या स्वागताला हजर होते. या आंदोलनावर देशभरातून प्रतिक्रिया येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. ही अराजकता पसरवण्याची मानसिकता असल्याचं त्यांनी म्हटलं.
आज आपण सर्वांनीच जंतर मंतरला बघितलं, ज्याप्रकारे त्याठिकाणी भाषण झाली, नारे लागले, वक्तव्य झाली त्यातून एक गोष्ट लक्षात आली की भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाही. तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच संविधान हातात घ्यायचं आणि त्या त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या. त्या संविधानाने तयार केलेली व्यवस्था उखाडून टाकायच बोलायचं, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राजधानी दिल्लीतील कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली.
संविधान केवळ पुस्तकं नाही, त्यातील प्रत्येक आर्टिकलमध्ये या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत, ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले, तरी ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत, ते संविधान विरोधी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, आज अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतेचा चेहरा आणि मनसुबे उघडे झाले आहेत, त्यांना कुठलंही समर्थन मिळालेलं नाही, अशा शब्दात सीजेपीच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीका केली.
दरम्यान, एकीकडे दिल्लीत अभिजीत दीपके यांच्या आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे कुटुंबीयांना त्यांची काळजी लागून लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संभाजीनगरच्या (Sambhajinagar) वाळूज येथील त्यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके आंदोलनानंतर आता आपल्या आई-वडिलांच्या भेटीसाठी निघाले आहेत.
भारतीय युवक राष्ट्र निर्मित्तीसाठी काम करेल – नबीन
आजचा युवक देशाच्या निर्मित्तीसाठी काम करू इच्छित आहे, आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी काम करू इच्छित आहे. मात्र, काही लोकांनी देशातील तरुणाईला अँटी इस्टॅब्लिशमेंट नाव दिलंय. मी मानतो की देशातील तरुण इनोव्हेशन आणि क्रिएशनसाठी ओळखला जायला हवा, भारतीय युवक अनुशासनसह देश निर्माणासाठी काम करेल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्त
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Comments are closed.