लग्नात देवेंद्र फडणवीसांच्यासमोर स्वत:चा सत्कार करुन घेतला, तितक्यात पोलिसांना संशय आला अन्…


देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर होते. धुळे सोलापूर रोडवर तिसगाव गावात एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थिती लावली. याच विवाह सोहळ्यात एक व्यक्ती पंतप्रधान कार्यालयाचा (PMO office) सचिव म्हणून फिरत होता. एवढेच नाही तर या पीएमओ कार्यालयाच्या तोतया सचिवाने मुख्यमंत्र्यांसमोर आपला सत्कारही करून घेतला. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याची चौकशी केली असता धक्कादायक बाब उघडकीस आली. त्याच्या सुटकेसमध्ये भारत सरकार अशी मराठी आणि इंग्रजी पाटी, राष्ट्रध्वज आढळून आला आहे. पीएमओ सचिव म्हणून तोतयागिरी करणाऱ्यासह त्याच्या बॉडीगार्ड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक भारत ठोंबरे (रा. दिल्ली मूळ उंदरी तालुका केज जिल्हा बीड) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तर विकास प्रकाश पांडागळे (रा.पुणे) असे बॉडीगार्ड म्हणून मदत करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून आता या दोघांची चौकशी सुरु आहे. यापूर्वी त्यांनी पीएमओ कार्यालयाचे सचिव असल्याचे भासवून कोणाला गंडा घातला आहे का, याची तपासणी केली जात आहे. पोलीस या दोघांवर काय कारवाई करणार, ते पाहावे लागेल.

दरम्यान, भाजपकडून सध्या राज्यभरात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु आहे. बंडखोरीची शक्यता लक्षात घेत उमेदवारी न मिळालेल्यांची मनधरणी करा, असे आदेश भाजपने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना देण्यात आले आहेत. त्यानुसार काही उमेदवारांकडून बंडखोर आणि नाराजांच्या गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. सोबतच, जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार यंत्रणा राबवण्याची सक्त ताकीदही भाजप आमदारांना देण्यात आली आहे. भाजपकडून सध्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना अनेक बी  वाटप केले जात आहे. काही ठिकाणी अजूनही वाद असलेल्या जागी आज फॉर्मचे वाटप करण्यात येईल.

Chhatrapati Sambhajinagar crime news: बँक कर्मचाऱ्याला 25 लाखांना लुटणारी टोळी 24 तासांमध्येच जेरबंद

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखेतून दावरवाडी शाखेत पंचवीस लाख रुपयांची रोकड घेऊन येणाऱ्या बँक कर्मचाऱ्याचे 25 लाख रुपये हिसकावण्यात आल्याची घटना शनिवारी पाचोड-पैठण रस्त्यावर दावरवाडी शिवारात घडली होती. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच छत्रपती संभाजीनगर मधील स्थानिक गुन्हा शाखेने शनिवारी दिवसभर परिसर पिंजून काढून तपासाची चक्र फिरवून तब्बल 24 तासामध्येच चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हा शाखेला यश आले आहे. या प्रकरणी भारत राजेंद्र रूपेकर वय 30 रा. नानेगांव ता. पैठण, 2) विष्णु कल्याण बोधने वय 24 वर्ष रा. नानेगांव, 3) सचिन विठठल सोलाट वय 25 वर्ष, रा. राहूल नगर, उत्तर जायकवाडी, पैठण, 4) विशाल दामोधर चांदणे वय 24 वर्ष रा. अखातखेडा पैठण तालुक्यातील  या आरोपीच्या आर्थिक गुन्हा शाखेने मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून एकूण 31 लाख 56 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आणखी वाचा

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, चाकणमध्ये ठाकरे-शिंदेंची शिवसेना एकत्र

आणखी वाचा

Comments are closed.