एकनाथ शिंदे अन् अजितदादांना मराठा आरक्षणाचं काम करु दिलं नाही; जरांगेंच्या आरोप, फडणवीस म्हणाले

देवेंद्र फड्नाविस हँड्स जरेंगे: एकीकीडे सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे (मराठी) मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही, असा खळबळजनक दावा मनोज जरांगेंनी एबीपी माझाच्या झिरो अवर या कार्यक्रमात केलाय. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मराठा आरक्षणाचं काम देवेंद्र फडणवीसांनीच करू दिलं नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 8 महिन्यात मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला नाही, यावरून त्यावेळीही देवेंद्र फडणवीसांनीच काम रोखल्याचा आरोपही मनोज जरांगे यांनी केला आहे. यावरून आता पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनोज जरांगेंच्या या आरोपावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगेंच्या आरोपवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आमच्यामध्ये कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही एक आहोत, असं म्हणत मनोज जरांगेंना केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे साहेब असं नाही म्हणाले माझे आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे. कोणीही काड्या टाकायचा, बांबू टाकायचा प्रयत्न केला तरी एकना शिंदे आणि माझे चांगले आहे,असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. लोकशाहीमध्ये सगळ्यांना आंदोलन करण्याचा हक्क आहे. लोकशाही पद्धतीने कोणी करत असेल तर सरकार थांबवणार नाही. पण हिंदूचा सण आहे, यात कोणता विघ्न यायला नको. आंदोलकही या सणात कोणता खोडा घालणार नाहीत. छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. त्यामुळे त्यांनी तसं केलं नाही तर आपणही करणार नाही.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

2. हैदराबाद गझेटियर लागू करा… 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला साताराबाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मार्ग कसा असणार? (What will be the road map of Manoj Jarange movement?)

– अंतरवालीवरून 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता निघणार…

– अंतरवाली – पैठण -शेवगाव (अहिल्यानगर)..कल्याण फाटा -आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी..)

– 28 ऑगस्टला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी चेंबूर…28 ऑगस्ट रोजी रात्री आझाद मैदानावर पोहचणार.

– 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार…

https://www.youtube.com/watch?v=ZCEUNKRUS

संबंधित बातमी:

Manoj Jarange On Devendra Fadnavis: मी स्वत: देवेंद्र फडणवीसांना फोन केलेला; नेमकं काय बोलणं झालेलं?, मनोज जरांगेंनी सगळं सांगितलं!

आणखी वाचा

Comments are closed.