मुंबईचा महापौर मराठीचं होणार अन् आमचाच होणार, राज ठाकरेंनी ठणकावले; आता देवेंद्र फडणवीस म्हणाले

देवेंद्र फडणवीस राज ठाकरे-उद्धव ठाकरेंवर: मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असा विश्वास मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केला होता. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या घोषणेसाठी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray-Uddhav Thackeray Yuti) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे.’ हे माझं वाक्य होतं. हे निव्वळ मुलाखतीतलं वाक्य नाहीये, तर ही तीव्र भावना आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

मुंबईचा महापौर मराठीच होणार, राज ठाकरेंच्या या विधानावर (Mumbai BMC Marathi Mayor) आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत महापौर कोणाला करायचं अशी लढाई नाही. मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आणायची आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढायचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच जिहादी मानसिकता ठेचण्यासाठी आम्ही उतरलोय, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मुंबईत अटलजींच्या नेतृत्वाखाली भाजपाचा जन्म झाला आहे. अटलजींचं मुंबईत उत्तम स्मारक झालं पाहिजे. कोणाला महापौर बनवण्यासाठी लढाई नाही, मुंबईकरांची लढाई आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. (Shivsena UBT MNS Yuti)

मुंबईकर महायुतीचे काम बघूनच मतदान करतील- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Raj Thackeray)

कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवायला जे काही करावे लागते तेच हे दोन्ही पक्ष करत आहेत. निवडणुकीसाठी आणखी दोन-चार जण सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीचे काम बघूनच मतदान करतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ज्याप्रकारे या मंडळींनी सातत्याने मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे, मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवायचे काम केले आणि पाप केले आहे, त्यामुळे मराठी माणूस त्यांच्यासोबत नाही. मुंबईत यांच्यासोबत यायला कोणीही तयार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड केवळ भ्रष्टाचार आणि स्वहिताचा राहिला आहे. केवळ निवडणुका जवळ आल्या की भावनिक बोलायचे. पण जनता आता या भावनिक बोलण्याला भुलणारी नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद, VIDEO:

संबंधित बातमी:

Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!

आणखी वाचा

Comments are closed.