जोपर्यंत सूर्य-चंद्र असतील तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील, देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती
देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन 2025 मध्ये: महाराष्ट्र हे शक्तिशाली राज्य आहे. 2029 ते 2030 दरम्यान महाराष्ट्र (Maharashtra Economey) हा देशातील पहिली एक ट्रिलिनय डॉलर्सची अर्थव्यवस्था असेल, याबद्दल मला विश्वास आहे. आपल्या तिजोरीत खूप पैसे नसले तरी आजघडीला महाराष्ट्र हा सशक्त अर्थव्यवस्थेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या देशातील मोजक्या राज्यांपैकी एक आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते रविवारी हिवाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावल्याचे सर्व आरोप फेटाळत लावत राज्याची अर्थव्यवस्था सुदृढ असल्याचा दावा केला. (Maharashtra Winter Session 2025)
आपण महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्युमेटं तयार केले आहे. त्यामध्ये 2047 चा विकसित महाराष्ट्र कसा असेल याचा रोडमॅप आपण तयार केला आहे. 2030 चा पहिला टप्पा, 2035 चा दुसरा टप्पा आणि 2047 चा तिसरा टप्पा आहे. मला विश्वास आहे की, 2029 ते 2030 दरम्यान महाराष्ट्र हा देशातील पहिली एक ट्रिलिनय डॉलर्सची अर्थव्यवस्था असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत, असे मी म्हणणार नाही. पण मी एवढं निश्चित सांगतो, देशातील मोठ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थांचा विचार केला तर आजही सर्व निकषांवर पात्र होणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे. राज्यातील विकासासाठी कर्ज उभारावे लागते. प्रत्येक राज्य ते कर्ज उभारते. त्यामध्ये रिर्झव्ह बँकेने आणि एफआरबीएमने आपल्याला राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 25 टक्के कर्ज उभारण्याची परवानगी दिली आहे. त्याच्यावर आपण गेलो तर अर्थव्यवस्था अडचणीत आली, असा त्याचा अर्थ होतो. आपण 2025-26 चे अर्थसंकल्पीय अंदाज आणि आतापर्यंत घेतलेल्या कर्जाचा विचार केला तर आपण एकूण स्थूल उत्पन्नाच्या 18.87 टक्के एवढे कर्ज घेतले आहे. 25 टक्क्याच्या मर्यादेपासून आपण पुष्कळ दूर आहोत. देशात अशी फक्त तीन राज्यं आहे, ज्यांचं हे दायित्व 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे, यामध्ये गुजरात, महाराष्ट्र आणि ओरिसा यांचा समावेश आहे, हे सांगताना मला आनंद होतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
राजकोशीय वित्तीय तूट ही 3 टक्क्याच्या आत असणे गरजेचे आहे. आपण लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचे पैसे देऊनही आपली वित्तीय तूट 3 टक्क्याच्या आतच आहे. सरत्या वर्षात आपण वित्तीय तूट 2.76 टक्के इतकी मर्यादित ठेवली. या निकषातही आपली अर्थव्यवस्था कुठेही दिवाळखोरीकडे निघाली नाही. महसुली जमेशी व्याजाच्या प्रदानाची टक्केवारी आहे ती टक्केवारी आपण जर बघितली ती 11.53 टक्के आहे. पण गेल्यावर्षीच्या नोंदीनुसार ती 11.35 टक्के इतकी आहे. केंद्र सरकारने घालून दिलेल्या निकषापेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक महाराष्ट्र सरकारने केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Maharashtra Winter session 2025: जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत मुंबई ही महाराष्ट्राचीच राहील: देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र हे शक्तिशाली अशाप्रकारचं राज्य आहे, याबाबत संभ्रम ठेवण्याची गरज नाही. 106 हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र. त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, तोडली जाईल. निवडणुका आल्या की अशा चर्चा होत असतात. मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे, जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत मुंबई ही महाराष्ट्राचीच राहील. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जो मार्ग दाखवला, त्यांच्या तत्त्वाने आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गाने महाराष्ट्र चालत राहील.
छत्रपती शिवरायांचं तत्त्व महाराष्ट्राला मान्य होतेच, पण देशपातळीवर त्याबाबत अनेक संभ्रम होते. सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये मराठा साम्राज्यावर, हिंदवी साम्राज्यावर फक्त एक परिच्छेद होता. पण मुघलांचा इतिहास 17 पानांचा होता. पण आता हा इतिहास बदला आहे. आता सीबीएसईने छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा 21 पानांचा इतिहास अभ्यासक्रमात केंद्र सरकारने समाविष्ट केला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आणखी वाचा
Comments are closed.