आरोप करणाऱ्यांना कायदेशीर भाषेत उत्तर मिळेल; धैर्यशील मोहिते पाटलांचं प्रत्युत्तर

सोलापूर: माढा तालुक्यातील कुर्डू बेकायदा मुरूम उपसा प्रकरणी आज झालेल्या कुर्डूबंदमध्ये माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांना सोलापूर जिल्ह्याचा वाल्मिक कराड अशी उपमा देत अत्यंत गंभीर आरोप केले होते. यावर बोलताना आपल्यावर अशा पद्धतीने आरोप करणाऱ्याला कायदेशीर भाषेत उत्तर दिले जाईल, असे म्हणत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कुर्डू येथील मुरूम कारवाईला गेलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांना अजित दादांच्या कार्यकर्त्यांनी थेट फोन जोडून दिला होता आणि यानंतर अजित दादांनी (Ajit Pawar) धमकावणीच्या सुरात त्यांच्याशी केलेला संवाद समाज माध्यमांवर व्हायरल झाला असे? यावर अजितदादा अडचणीत आले होते. या प्रकरणावर बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डू गावात प्रचंड दहशत असून बीड सारखी परिस्थिती येथे असल्याचा आरोप केला होता. याच आरोपाच्या विरोधात आज कुर्डूमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी झालेल्या भाषणात कुर्डूचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी अकलूजमध्ये तरुणांच्या खुनाची मालिका सुरू होती, याबाबत गंभीर आरोप करीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील हेच सोलापूर जिल्ह्याचे वाल्मिक कराड आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य केलं. यालाच उत्तर देताना आज खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आरोप करणाऱ्यांना कायदेशीर भाषेत उत्तर मिळेल, असा इशारा दिला आहे.

अण्णा ढाणे हे देखील या प्रकरणातील एक आरोपी- धैर्यशील मोहिते पाटील

दरम्यान आपण केलेले सर्व आरोप कायदेशीर पुराव्यानिशी केलेले असून केवळ सरकारी जमिनीतील बेकायदा मुरूम उपसा झाल्याचे आणि येथील गुंडगिरीचे दाखले दिले होते. बेकायदा मुरूम उपसा व सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे, मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, अशा विविध गुन्ह्यातील आरोपींना अद्याप पोलिसांनी अटक का केली नाही? असा सवाल ही खासदार मोहिते पाटील यांनी केला आहे. आज खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप करणारे अण्णा ढाणे हे देखील या प्रकरणातील एक आरोपी असून आरोपांना कायदेशीर भाषेत उत्तर देण्याचा इशारा खासदार मोहिते-पाटील यांनी दिल्याने हे प्रकरण अजून वाढत जाणार असल्याची चर्चा आहे?

नेमकं काय म्हणाले होते अण्णा ढाणे ?

अकलूजमध्ये सातत्याने झालेल्या खुनाच्या मालिकेला शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील जबाबदार असून सोलापूर जिल्ह्याचे वाल्मीक कराड असल्याचा गंभीर आरोप माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. अकलूज परिसरात 16 ते 17 तरुण मुलांचे खून झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या दोष-पार्टारोपांवरून कुर्डू प्रकरणातील मुरूम उपसा प्रकरणाला आता राजकीय रंग येऊ लागला आहे?

संबंधित बातमी:

आणखी वाचा

Comments are closed.