धनंजय देशमुखांचे साडू, व्हिडिओ व्हायरल; कोण आहेत दादासाहेब खिंडकर?, गुन्हेगारी कुंडली एका क्लिक

दादासाहेब खिंदकर: बीडमध्ये एकीकडे संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येनंतर एकीकडे देशमुख कुटुंबियांचा न्यायासाठी संघर्ष सुरु आहे. सर्व आरोपींना फाशी व्हावी या मागणीसाठी धनंजय देशमुखांसह कुटुंब न्याय मागत असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यात धनंजय देशमुखांच्या साडूचा दादासाहेब खिंडकरांचा एक जूना व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल झाला. यात धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ जून असून तो वाद कधीच मिटला असल्याचं ते सांगतात. मात्र, दादासाहेब खिंडकरांवर घरफोडी,  पैसे उकळून फसवणूक अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. (Beed)

कोण आहे दादा खिंडकर?

– बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावचा सरपंच पती दादासाहेब खिंडकर आहे.
– धनंजय देशमुख यांचा तो साडू आहे.. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी तो सक्रिय सहभागी होता.
– दादासाहेब खिंडकर याच्यावर अनेक ठिकाणी गंभीर गुन्हे आहेत.
– गेल्या दहा वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे..
– राष्ट्रवादीचा तो कार्यकर्ता आहे.
– सामान्य शेतकरी कुटुंबातील दादा खिंडकर यांनी गेल्या दहा वर्षात ग्रामपंचायत ताब्यात आहे.
– ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक वाद आणि भांडण समोर आले होती

दादासाहेब खिंडकरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अनेकांचे जुने व्हिडिओ समाज माध्यमावर समोर येत आहेत.. धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर याने एका तरुणाला बेदम मारहाण करताना आणि एका गाडीची तोडफोड करतानाचा असे दोन व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल होत आहे. हे प्रकरण जुने असले तरी याची  सध्या सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे या प्रकरणात दादा खिंडकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहेत.

बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावातील ओमकार सातपुते या तरुणाला चार जणांच्या टोळक्याकडून मारहाण होत आहे. ज्यात दादासाहेब खिंडकर याचा समावेश आहे. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सदरील प्रकरण आपापसात मिटवण्यात आले.

या व्हिडिओ नंतर सध्याचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या गाडीची तोडफोड करून घरावर हल्ला करतानाचा व्हिडिओ समोर आला. या प्रकरणात देखील दादा खिंडकर घरफोडी सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

याव्यतिरिक्त नागपूर येथे तरुणांना नोकरी लावतो म्हणून पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी 420 अंतर्गत गुन्हा नोंद आहे.

https://www.youtube.com/watch?v=1bvlpkhg9e4

हेही वाचा:

सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराशी संतोष देशमुखांचं खास नातं, पत्नीनं सांगितलं पुणे कनेक्शन

अधिक पाहा..

Comments are closed.