‘मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला’ : धनंजय मुंडे
धनंजय मुंडे: छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात जे वातावरण होतं, तेf वातावरण महाराष्ट्रात अनेक वर्ष राहिलं, मधल्या काळात फक्त काही गोष्टी झाल्या, त्याची चर्चा आता होऊ नये. मराठा व्यावनाचा विषय माझ्या दृष्टीने आत्मीयतेचा विषय होता. तुम्ही माझ्या वरती प्रेम केलंमधल्या काही दोन-तीन वर्षाचा विषय सोडला तर तुम्ही जेवढा जीव लावला त्याचे माझ्यावर उपकार आहेत. मधल्या दोन-तीन वर्षात काय झालं त्यामुळे माझ्या कर्तव्यात काही बदल होऊ शकला नाही. मी जात-पात धर्म सोडून राजकारण केलं आहे. पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला. असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलंहे.
आमदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मराठा भवन (Maratha Bhawan Bhoomi Pujan) उभारणीसाठी तब्बल 28 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मराठा व्यावनाला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठा युवा मंचकडून आमदार धनंजय मुंडे यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत.
Dhananjay Munde: डोक्यात आहे ते ओठावर आहे, जे ओठावर आहे ते डोक्यात आहे.
जे काही आहे ते समोर आहे. ताकाला जाऊन भांड लपवायचा स्वभाव माझा नाही. डोक्यात आहे ते ओठावर आहे, जे ओठावर आहे ते डोक्यात आहे. आपण मराठा समाजाला दिलेली जागा संपूर्ण डेव्हलप करून देणार आहोत. परळीत होत असलेला एग्रीकल्चर कॉलेजचे काम पुढच्या पन्नास वर्षाचा अंदाज घेऊन केले जात आहे, तशाच पद्धतीचे हे मराठा भवन असणार आहे. याआधी अनेकदा बैठका गार्डनमध्ये घ्यावा लागत होत्या, ते मला बघवत नव्हतं. असेही धनंजय मुंडे म्हणाले.
Dhananjay Munde: झालेल्या वेगवेगळ्या गोष्टी या तात्पुरत्या असतात, माझा नियतीवर फार विश्वास
झालेल्या वेगवेगळ्या गोष्टी या तात्पुरत्या असतात, आंदोलन तात्पुरते असतात, एखाद्या बद्दलची चुकीची भावना तात्पुरती असते. आज ना उद्या खरं काय ते कळतच असतं. त्यामुळे मी दीड वर्ष शांत होतो. माझा नियतीवर फार विश्वास आहे. माझी नियत साफ राहिली तर माझ्या बाबतीत जो गैरसमज झाला आहे तो नियतीच दुरुस्त करून देणार, हे मला माहित आहे. म्हणून आज हे सगळं नियतीने घडवलं आहे. तालुकास्तरावरील 28 गुंठ्यावर हे पहिलंच मराठा भवन असणार आहे. या वास्तूची एक एक वीट बनवलेलेपर्यंत तसेच ते पूर्ण होईपर्यंत कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. ही जबाबदारी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं व्यक्त करतो. असेही धनंजय मुंडे म्हणाले.
Dhananjay Munde: समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन कर्तव्य पार पाडावे, नाहीतर एकच व्हिलन असं करू नका
लोकप्रतिनिधीच्या निवडणुकीत कोणी विरोध केला असेल. शेवटी निवडून आल्यावर तो लोकप्रतिनिधी त्या मतदारसंघातील सर्व जनतेचा असतो. समाजामधील अल्पभूधारक असलेल्या नागरिकांसाठी हे मराठा भवन म्हणजे शैक्षणिक मंदिर होणार आहे, याचा मला आनंद आहे. यावेळी ज्याची जमीन देण्यात आली आहे त्यांनी धनंजय मुंडे यांनी केलेल्या मदतीची आभार व्यक्त केले. राजकीय वैचारिक विरोधात असावा पण शहराच्या विकासासाठी समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपले कर्तव्य पार पाडावेत. नाहीतर एकच व्हिलन असं करू नका. शेवटी आपण सर्वांनी चांगल्याला चांगलं आणि वाईटल वाईट म्हटलं पाहिजे. त्यावेळेस वातावरण तसं झालं होतं, गैरसमज झाले होते. भावनिक वातावरण होतं. लोकसभा निवडणुकीचा जास्त लोड घेतला होता. आता नव्याने आपल्याला या ठिकाणी आपण सर्वांनी सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन त्या विकासामध्ये प्रत्येक जाती धर्माचा योगदान असलं पाहिजे. असं काम करायचं आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.