भाषण सुरु असताना धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण? म्हणाले, ‘आज इथे एक माणूस नाहीये’


Dhananjay Munde & Walmik Karad: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या उपस्थितीत परळी नगरपरिषद निवडणुकीच्या (Parli Nagar Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीचा भव्य संयुक्तिक कार्यकर्ता मेळावा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी 10 महिन्यापासून जगमित्र कार्यालय सुरू आहे. आज इथे एक माणूस नाही, असे वक्तव्य केले. यामुळे धनंजय मुंडे यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराडची (Walmik Karad) आठवण काढली की काय? अशी चर्चा आता बीडमध्ये रंगली आहे.

धनंजय मुंडे भाषणात म्हणाले की, महायुतीचे सर्व उमदेवार आपण निवडून आणून महाराष्ट्राला दाखवून देऊ. ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची, स्वाभिमानाची, अभिमानाची आहे. गेल्या एक वर्षापासून परळीला ज्यांनी बदनाम केले, त्याला उत्तर द्यायचे आहे. दोस्तीमध्ये कुस्ती नाही. मी माझ्या जीवनात कुठलीच निवडणूक सोपी घेतली नाही. परळीकरांचे ऋण मी फेडू शकत नाही. परळीची प्रगती तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल. तीर्थक्षेत्र विकासाची कामे परळीत होत आहेत. याच वर्षात ही सर्व कामे करायची आहेत. समोरच्याच व्हिजन आम्हाला माहित नाही. समोरचा माणूस तुतारी घेऊन आला. माझ्यावर अनेक वार झाले, पण मी डगमगलो नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

DHANGAY unde and Valikyarda: धनंजय जय मुंडण वाल्मिक कराड?

धनंजय मुंडे पुढे म्हणाले की,  उठसूट परळीवर आरोप झाले, नाथराला नाव ठेवले. माझं सर्व काम महायुतीचे सहकारी करतात. हा विजय ऐतिहासिक करण्याची जबाबदारी माझी आणि ताईची आहे. आज पासून 2 तारखेपर्यंत गप्प बसायचे नाही. मी जास्त मतांनी निवडून आलो नसतो तर मला त्रास झाला नसता. परळीतील मातीसाठी इथेच प्राण गेले तरी चालेल. आज 10 महिन्यापासून जगमित्र कार्यालय सुरू आहे. आज इथे एक माणूस नाही, त्यांनी म्हटले. यामुळे धनंजय मुंडे यांनी नाव न घेता वाल्मिक कराडची आठवण काढली का? अशी चर्चा आता रंगली आहे.

Pankaja Munde Speech: काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांनी भाषणात अ‍ॅडव्हान्समध्ये महायुतीच्या नगरपरिषदेच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. परळीची जनता इतिहास घडवणार आहे. आम्ही स्वतःचे इगो बाजूला ठेवले आहेत. मुंडे साहेबांचं नाव आपण वेगळं करू शकत नाही. मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले, सायकलवरून फिरले. आपण एकत्र निवडणूक लढलो तर विकास जिंकेल, असे त्यांनी म्हटले. तर श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड याचा पंकजा मुंडे यांनी भाषणात आवर्जून उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले. तर माझ्या हातात राहो न राहो वैद्यनाथ कारखाना सुरू झाला आहे. आता फक्त परळीचा विकास करायचा आहे, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले.

आणखी वाचा

Who is Anant Garje : मेकॅनिकल इंजिनिअर, मुख्यमंत्री फेलोशिपमध्ये काम, पाथर्डीचा अनंत गर्जे पंकजा मुंडेंचा PA कसा बनला?

आणखी वाचा

Comments are closed.