धनंजय मुंडेंकडे बुलेट ते मर्सिडीज बेन्झ कारसह विविध वाहनं ताफ्यात, नेमकी किती संपत्ती?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो आरोपपत्रातून समोर आल्यानंतर राज्य सरकारवरील दबाव वाढला. यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीला धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल पटेल उपस्थित होते. या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी आज त्यांचा राजीनामा स्वीय सहायक प्रशांत जोशी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून ते आमदार म्हणून काम करतील. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ते राज्यातील सर्वाधिक मतांनी विजयी होणाऱ्या पहिल्या तीन आमदारांमध्ये होते. त्याच विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मालमत्तेचा तपशील दिला होता.
धनंजय मुंडे यांची संपत्ती किती?
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचं दिसून आलं होतं. मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रातून ती माहिती समोर आलेली . धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला. त्यासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्तीची माहिती नमूद करण्यात आलेली. 2019 मध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे 23 कोटींची संपत्ती होती. 2024 मध्ये सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात 53.80 कोटींची संपत्ती नमूद करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
पाच वर्षात मुंडेंच्या संपत्ती 31 कोटींची वाढ
2019 ते 2024 पाच वर्षांमध्ये मुंडेंच्या संपत्ती सुमारे 31 कोटी रुपयांनी वाढली आहे. धनंजय मुंडे त्यांची पत्नी आणि कुटुंबाकडे 53 कोटी 80 लाखांची संपत्ती आहे. मागील पाच वर्षात यामध्ये दुपटीने म्हणजे 30.75 कोटी रुपयांची वाढ झाली. 2019 मध्ये त्यांच्याकडे 23 कोटींची संपत्ती होती.
धनंजय मुंडे यांच्याकडे 15 कोटींची वाहने, दीड किलो चांदी आहे. तर त्यांच्या नावे 15 कोटी 55 लाख 5 हजार 105 रुपयांचे विविध वाहने आहेत. टँकर पासून ते बुलेट पर्यंतच्या सात वाहनांचा यात समावेश आहे. सात लाख तीन हजार रुपयांचे 190 ग्रॅम सोने आहे.
तर पत्नीच्या नावे 31 लाख 78 हजार 675 रुपयांची दोन वाहने आहेत. 22 लाख 90 हजारांचे 620 ग्रॅम सोने आणि 72 हजारांची दीड किलो चांदी आहे.
धनंजय मुंडे यांचा राजकीय प्रवास
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात भाजपमधून केली. भाजप सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना राज्याचं विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं होतं. ठाकरेंच्या सरकारच्या काळात ते सामाजिक न्याय मंत्री होते. एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये कृषीमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते.
https://www.youtube.com/watch?v=mlkhss4fvo8
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.