अनेकांच्या भावनिक व अविचारी कृतीमुळं आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्या बळ मिळतं : धनंजय मुंडे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांच्या समर्थकांना एक आवाहन केलं आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी आपल्याला न्याय मिळाला म्हणून कोणीही इतरांना हिणवू नये. हा षडयंत्राचा काळ असल्याचं म्हटलंय. आपल्यापैकी अनेकांच्या भावनिक आणि अविचारी कृतीमुळं आपल्या विरोधात षडयंत्र करणाऱ्यांना अधिक बळ मिळते, असंही धनंजय मुंडे म्हणाले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह केलेले आरोप राज्य लोकायुक्तांनी फेटाळल्यानं धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाल्याचं चित्र आहे.
Dhanajay Munde : धनंजय मुंडे यांची पोस्ट
प्रत्येकाला आपल्या उद्दिष्ट आणि हेतूप्रमाणे कृती करण्याचा अधिकार आहे. आपण आपल्या परीने न्याय-दाद मागण्याच्या प्रक्रियेतून जात आहोत. अश्या परिस्थितीत आपल्याला न्याय मिळाला म्हणून कोणीही इतरांना हिणवू नये. हा षडयंत्रांचा काळ आहे. आपल्यापैकी अनेकांच्या अश्या भावनिक व अविचारी कृतीमुळे आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्यांना अधिक बळ मिळते, हे लक्षात घ्या.
शेवटी संयम सर्वात महत्त्वाचा!
धनंजय मुंडे यांचं संयम राखण्याचं आवाहन
महाराष्ट्र राज्य लोकायुक्तांनी कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट या प्रकरणात धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाल्यानं काही जणांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. त्या पोस्ट समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. आपण न्याय आणि दाद मागण्याच्या प्रक्रियेतून जातोय. आपल्याला न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नये, असं धनंजय मुंडे यांनी समर्थकांना सुनावलं आहे. हा षडयंत्रांचा काळ आहे. आपल्यापैकी अनेकांच्या अश्या भावनिक व अविचारी कृतीमुळे आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्यांना अधिक बळ मिळते, हे लक्षात घ्या. शेवटी संयम महत्त्वाचा असतो असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
अंजली दमानिया यांनी देखील महाराष्ट्र लोकायुक्तांच्या निकालानंतर भूमिका स्पष्ट केली आहे. ही बाब सार्वजनिक हिताची असून, संबंधित सर्व कागदपत्रे व पुरावे याबाबत पुढील कायदेशीर पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. भ्रष्टाचाराविरोधातील लढा कायम राहील, अशी माझी भूमिका स्पष्टपणे नमूद करते, असं म्हटलंय.
दरम्यान, अंजली दमानिया यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर काही फोटो शेअर केले असून टीका करणारे लोक धनंजय मुंडे समर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
प्रत्येकाला आपल्या उद्दिष्ट आणि हेतूप्रमाणे कृती करण्याचा अधिकार आहे. आपण आपल्या परीने न्याय-दाद मागण्याच्या प्रक्रियेतून जात आहोत. अश्या परिस्थितीत आपल्याला न्याय मिळाला म्हणून कोणीही इतरांना हिणवू नये. हा षडयंत्रांचा काळ आहे. आपल्यापैकी अनेकांच्या अश्या भावनिक व अविचारी…
— धनंजय मुंडे (@dhananjay_munde) ३ मार्च २०२६
आणखी वाचा
Comments are closed.