धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला; शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव, फ
धाराशिव जि.प. धाराशिव जिल्हा परिषदेतील (Dharashiv Zilla Parishad) सत्तास्थापनेसाठी महायुतीत (Mahayuti) (भाजप–शिवसेना शिंदे गट) महत्त्वपूर्ण हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला राबवण्याचा प्रस्ताव शिवसेनेने (Shiv Sena) भाजपसमोर (BJP) मांडला आहे. या सूत्रानुसार, अडीच वर्षे भाजपकडे अध्यक्षपद, तर उर्वरित अडीच वर्षे शिवसेनेकडे अध्यक्षपद राहणार आहे.
तसेच भाजपचा अध्यक्ष असताना शिवसेनेचा उपाध्यक्ष, आणि शिवसेनेचा अध्यक्ष असताना भाजपचा उपाध्यक्ष राहील. याचबरोबर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना सभापती पद देऊन सत्तेत सहभागी करून घेण्याचा प्रस्तावही चर्चेत आहे. या अध्यक्षपदाच्या फॉर्म्युल्यावर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आहे.
Dharashiv ZP: फडणवीस-शिंदेंमध्ये आज बैठक होण्याची शक्यता
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी एबीपी माझाशी बोलताना या सत्ता सूत्रांवर चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंतिम निर्णय घेणार असून, दोघांमध्ये आज बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदांतील सत्ता समीकरण लक्षात घेऊन धाराशिवमधील निर्णय ठरणार असल्याचे सांगितले जाते.
Dharashiv ZP: अध्यक्षपदासाठी दोन नावे चर्चेत
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून अर्चना पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्या भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. तर शिवसेनेकडून उषा गायकवाड (माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी) यांचे नाव चर्चेत आहे.
Dharashiv ZP: निकालानंतर मुंबईत राजकीय हालचाली
जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होताच सर्व प्रमुख नेत्यांनी मुंबईत तळ ठोकला असून, सत्ता स्थापनेच्या रणनीतीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. याचवेळी शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाला विरोध केल्याची चर्चा आहे. सावंत हे निवडणुकीपूर्वी महायुतीत नसल्याने, त्यांना वगळून सत्ता स्थापन करण्याची भाजपची रणनीती असल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये नेमकी कोणती सत्ता रचना आकार घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dharashiv ZP: निकालाचा थोडक्यात आढावा
धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजप 19 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला 15 जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागांवर यश मिळाले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले असून काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र एकही जागा जिंकता आलेली नाही.
धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल- (Dharashiv ZP Election 2026)
एकूण जागा- 55
भाजप – 19
शिवसेना (शिंदे गट) – 15
ठाकरे गट (शिवसेना उत्तर प्रदेश) – 7
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)-6
काँग्रेस- 3
अपक्ष – 3
अपक्ष (भाजप पुरस्कृत) – 1
समाजवादी पक्ष – १
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.