सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन जखमी
खरातचे व्हिडिओ शेअर करु नका
भोंदू बाबा कॅप्टन खरात प्रकरणात पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. कोपरगाव तालुक्यात ही करावाई करण्यात आली. एका आरोपीचा शोध अद्यापही सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. तपासा दरम्यान एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर संबंधित पीडित महिलेचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील स्वरूपाचे असून यामध्ये अनेक महिला पीडित असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पीडित महिलांची ओळख उघड होऊ नये, यासाठी नागरिकांनी असे व्हिडिओ पुढे शेअर करू नयेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, यांच्याकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.