धनंजय मुंडेंच्या मागे हात धुऊन लागलेल्या सुरेश धसांना अजित पवारांनी भेट नाकारली?
पुणे: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्याचं दिसून आलं, मात्र आता सुरेश धस (Suresh Dhas) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांची भेट घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या 2019 ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करणार होते. मात्र, धस यांना अजित पवारांकडून भेटीसाठी वेळ न मिळाल्याने आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना भेटणं बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी टाळलं का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अजित पवार यांची भेट न घेताच सुरेश धस बीडला रवाना झाल्याची माहिती आहे.
अजित पवार यांची भेट घेऊन आज सुरेश धस 2019 पासून ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते. सुत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांची वेळ न मिळाल्याने सुरेश धस बीडला निघून गेले आहेत. सध्या अजित पवार यांनी चौकशी समितीला केवळ2023-2024 या आर्थिक वर्षाची जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सुरेश धस यांचं म्हणणं आहे, धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जिल्हा नियोजन विभागाच्या कामात बीडमध्ये झाला आहे. धस यांच्या वतीने आधीच 72 कोटी रुपयांची बोगस बिले पुरावा म्हणून अजित पवारांना देण्यात आली आहेत.
धस यांना भेटणं अजित पवारांनी टाळालं?
आमदार सुरेश धस यांना भेटणं अजित पवारांनी टाळालं का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार यांची वेळ न मिळाल्याने सुरेश धस बीडकडे रवाना झाले आहेत. आज अजित पवार यांची भेट घेऊन आमदार सुरेश धस 2019 ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांची वेळ मागितली होती. मात्र, अजित पवार यांनी धस यांना भेटीसाठी वेळ दिली नाही, त्यामुळे धस बीडकडे रवाना झाले आहेत. सुरेश धस अजित पवार यांना भेटून 2019 ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करणार होते.
जेव्हापासून धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री झाले होते, तेव्हापासून म्हणजेच 2019 ते 2023 या काळामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या काळातील कामांची चौकशी होणे गरजेचे आहे, त्यामुळे अजित पवार यांना स्वतः भेटून पत्र देऊन या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी ते करणार होते. मात्र अजित पवार यांच्या वतीने सुरेश धस यांना भेटीसाठी वेळ मिळालेली नाही.
या संपूर्ण प्रकरणांमध्ये पुरावा म्हणून सुरेश धस यांनी याआधीच 72 कोटी रुपयांची बिल दिली आहेत, कशा पद्धतीने 72 कोटी रुपये लाटले गेले याचे पुरावे देखील त्यांनी अजित पवार यांच्याकडे सादर केलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणात लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे. मात्र अजित पवारांनी त्यांच्या भेटीची वेळ टाळली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. 2019 ते 2023 या काळातील चौकशीसाठी अजित पवार अनुमती देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, सुरेश धस या संपूर्ण प्रकरणात काय भूमिका घेतात हे देखील लवकरच स्पष्ट होईल.
अधिक पाहा..
Comments are closed.