माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट निघाल्याने देवेंद्र फडणवीस नाराज, अजित पवारांशी तातडीची चर्चा, मंत

माणिकराव कोकाटे अटक वॉरंट राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले आहे. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक उच्च न्यायालयाने काल (मंगळवारी, ता १६) सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. यानंतर सदनिका घोटाळाप्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे  (Manikrao Kokate Arrest Warrant) यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज युक्तिवाद होऊन न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत तातडीच्या सुनावणीची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोकाटेंवर कारवाई केली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

हायकोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे, अशी सुत्रांची माहिती आहे.
सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात माणिकराव कोकाटे हायकोर्टात जात आहेत. हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोकाटेंवर कारवाई नाही अशी माहिती समोर आली आहे.

Manikrao Kokate Arrest Warrant: माणिकराव कोकाटे यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तातडीच्या सुनावणीची मागणी करणार आहे. कोकटेंविरोधात अटक वॉरंट जारी केलं असताना कोकटेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिक्षेवर स्थगितीची याचिकेत मागणी देखील करणार आहे. माणिकराव कोकाटे हे सध्या रुग्णालयात दाखल असून त्याची देखील न्यायालयाला माहिती दिली जाणार  आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकिय सदनिकेच्या लाभ घेण्याप्रकरणी अडचणीत आलेले मंत्री माणिकराव कोकाटे सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीचा दिलासा न मिळाल्यास कोकटेंच्या अडचणी वाढणार आहेत.

Manikrao Kokate Arrest Warrant: …तर कोकाटे यांचा राजीनामा निश्चित: सूत्रांची माहिती

माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. तर कोकाटे यांचा राजीनामा निश्चित असल्याची सूत्रांची माहिती आहे. कोकाटे यांना अटक वाॅरंट निघाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही नाराजी व्यक्त केल्याची सुत्रांची माहिती आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.