Anna Bansode: “शरद पवार आमचे दैवत, पण नेतृत्व वहिनींचेच!”; राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाचे वारे, तटकरे, शेळकेंनंतर आता आण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर सुरू झालेल्या दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला आल्या आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत आणि पक्षातील घडामोडींवर महत्त्वाची वक्तव्ये केली आहेत. अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी विलीनीकरनाबाबत बोलताना म्हटलं की, सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, तर महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जनतेला मनापासून आनंद होईल. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते आणि आमदारांची अशीच इच्छा आहे की सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकजुटीने काम करावे.
शरद पवार हे त्यांच्यासाठी दैवत आहेत आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव सर्वांना मान्य आहे. मात्र, १९९९ पासून ते अजित दादांसोबत काम करत आले असून, आता सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी स्वीकारली आहे, ती त्या उत्तम प्रकारे पार पाडतील असा त्यांना विश्वास आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंद होईल. आम्ही सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि आता सर्व नेते आमदार यांनी इच्छा व्यक्त केली आहे की सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात. अजित पवार यांनी विलिनीकरणाबाबत कधीही चर्चा केलेली नव्हती. आता आम्हाला विश्वास आहे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही व्यवस्थित पुढे जात आहोत आणि विलिनीकरणाबाबत योग्य निर्णय होईल, असंही आण्णा बनसोडेंनी (Anna Bansode) म्हटलं आहे.
शरद पवारांचा नेतृत्व मान्य नसेल? या प्रश्नावर बोलताना आण्णा बनसोडे यांनी बोलताना म्हटलं की, त्यांचा अनुभव मोठा आहे. आम्ही त्यांच्याच नेतृत्वात १९९९ पासून काम करत आहोत. तर शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येईल का? या प्रश्नावर उत्तर देताना बनसोडे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी यायला काय हरकत आहे. सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी, असंही त्यांनी म्हटलंय.
तटकरे प्रफुल पटेल पक्ष कब्जा करू पाहत आहेत का? विरोधकांच्या आरोपांवर बोलताना बनसोडे म्हणाले, यात तथ्य नाही. तर सुनेत्रा पवार निर्णय घ्यायला कमी पडत आहेत? यावर बोलताना बनसोडे म्हणाले, त्यांनी आत्ताच कारभार हाती घेतला आहे. सर्वांचा विचार करून निर्णय घेतात. तर जय पवार यांची पत्रकार परिषदेत तटकरे प्रफुल पटेल यांनी अडवली का? यावरती म्हणाले,याबाबत माहिती नाही.
विलीनाकरणावर सुनील शेळके नेमके काय म्हणाले?
ष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार सुनील शेळके म्हणाले, दादांच्या (Ajit Pawar) दुर्घटनेनंतर शरद पवार यांच्या पक्षातील काही मंडळी सांगत होते, आमच्या दादांसोबत चर्चा झाल्या, दोन्ही पक्ष एकत्रित पुढे जायचं आहे, परंतु अशा पद्धतीने आमच्याशी किंवा पक्षातील कोणत्याही नेत्यांशी दादांनी विस्तृतपणे चर्चा केलेली नव्हती, परंतु ठीक आहे, दोन्ही पक्ष एकत्रित असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही, परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका किंवा भावना एकच होती. दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि उत्तर अधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी आल्या पाहिजेत, आदरणीय अजित दादा (Ajit Pawar) हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, ती जबाबदारी, तो मान, सुनेत्रा वहिनींना मिळाला पाहिजे होता. ही आमची भूमिका स्पष्ट होती, आज सुनेत्रा वहिनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या त्याचबरोबर राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस मोठा होत असेल सुनेत्रा वहिनींचा नेतृत्व त्यांना मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून पुढे जात असेल तर तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल, आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यामध्ये सर्वांनी सकारात्मकपणांनी पाहायला पाहिजे, असंही सुनील शेळकेंनी म्हटलं आहे.(Sunetra Pawar)
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर तटकरेंची प्रतिक्रिया
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण भाजपच्या दबावामुळे अडले आहे का, या प्रश्नाचे उत्तरही सुनील तटकरे यांनी दिले. त्यांनी म्हटले की, भाजपकडून कधी विलीनीकरणाबाबत दबाव राहिलेला नाही. ज्यावेळी आम्ही अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यानंतरच्या घडामोडी सर्वांनी पाहिल्या आहेत. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याच बाबतीत कधीही हस्तक्षेप केलेला नाही. भाजपच्या केंद्र आणि राज्य नेतृत्त्वाने आम्हाला नेहमीच मित्रपक्ष म्हणून सन्मानाची वागणूक दिली आहे. त्यामुळे भाजपचा दबाव असण्याचा प्रश्न नाही. प्रश्नांतर्गत आमचा विलीनीकरणाबाबत आमचं म्हणणं असण्याचं कारण नाही, यासंदर्भातील निर्णय वहिनीच घेतील. या क्षणाला माझ्याकडे यासंदर्भात कोणतीही माहिती नाही. पण ज्येष्ठ आमदार सुनील अण्णा कोणत्याही संदर्भात हे वक्तव्य केले आहे, हे मला माहिती नाही. त्यामुळे मला या विषयावर मत व्यक्त करायचं नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.
सुनेत्रा वहिनी या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष होणार, हा निर्णय त्यांच्याच संमतीने घेतला. त्यानंतर विलीनीकरणाच्या विषयावर पडदा पडला, त्यावर पुन्हा कधी चर्चा झालीच नाही. मी दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. मी अजितदादांसोबत महाराष्ट्रभर फिरलो आहे. पण विलीनीकरण हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. या सगळ्या जर-तरच्या गोष्टी असल्याने आज मला याबाबत काही बोलायचं नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.
आणखी वाचा
Comments are closed.