जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे देशातील टॉप शंभर पोलीस प्रमुखांच्या यादीत, फेम इंडिया–एशिया पोस्ट’ने केला गौरव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कायदा-सुव्यवस्थेसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा विविध उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस दलाच्या कामकाजात सुधारणा घडवून आणणारे  रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचा ‘फेम इंडिया–एशिया पोस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या देशातील सर्वोत्तम १०० पोलीस प्रमुखांच्या मानाच्या यादीत समावेश झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

‘फेम इंडिया’ आणि ‘एशिया पोस्ट’ या प्रतिष्ठित माध्यम संस्थांकडून देशभरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस प्रमुखांची निवड करण्यात आली आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण, कायदा-सुव्यवस्थेचे प्रभावी व्यवस्थापन, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य, आपत्कालीन परिस्थितीत निर्णयक्षमता, सक्षम नेतृत्व तसेच पोलीस दल आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करण्याची क्षमता अशा विविध निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

नितीन बगाटे यांच्या कार्यकाळात रत्नागिरी जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासोबतच त्यांनी अंमली पदार्थाच्या विरोधात धडक कारवाई केली.सायबर गुन्हेगारांचा शोध युध्दपातळीवर घेतला.वाहतूकीचे प्रश्न सोडवताना धडक कारवाया केल्या आहेत.अनेक गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती देण्याचे काम त्यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्तीच्यावेळी मदतकार्यात त्यांनी सहभाग घेतला आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून रत्‍नागिरी पोलीसांनी 29 सामाजिक उपक्रम सुरू करून पोलीस यंत्रणेत नवे प्रयोग करून कामकाजात सुधारणा आणि वेग आणला आहे. नवीन उपक्रमात ‘अधिनिर्णय‘ आणि ‘मिशन रॅपीड’ सारखे ॲप पोलिसांना मार्गदर्शक ठरेल आहेत. रेडस ॲपमुळे गुन्ह्यांची उकल होऊ लागली आहे. बंदोबस्त या ॲपमुळे पोलीस दलात त्यांनी शिस्त आणली आहे. ‘मिशन रायझिंग फलॉवर’ मोहिमेअंतर्गत विद्यार्थी वर्गाशी त्यांनी संवाद सुरू केला आहे.

Comments are closed.