Pune News – मोशी कचरा डेपो दुर्घटनेत पतीचा दुर्दैवी अंत, महिनाभरांनंतर पत्नीनंही मृत्यूला कवटाळलं

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पिंपरी-चिंचवड येथील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने महिनाभरानंतर पत्नीनेही जीवन संपवलं आहे. सोनाली नागेश गायकवाड असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे दोन मुली पोरक्या झाल्या आहेत. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नागेश गायकवाड यांच्यासह नऊ जणांचा मृत्यू झाला होता. नागेश यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी सोनाली या तणावात होत्या. या तणावातून त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आधी वडिलांचा अपघाती मृत्यू मग आईने जीवन संपवल्याने दोन चिमुकल्या मुलींचं मायेचं छत्र हरपलं आहे.

Comments are closed.