आर. एन. विद्यालयाचा 470 धावांनी महाविजय; विवान गुर्जर, सुवीर मेहरा आणि हृदान गंभीरची झंझावाती शतके
चौकार-षटकारांची आतषबाजी, शतकांची बरसात आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिव्याच्या आर. एन. विद्यालय संघाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत धडाकेबाज सलामी दिली. 45 षटकांच्या पहिल्याच सामन्यात आर. एन. विद्यालयाने दोस्ती फाऊंडेशन स्पूल, शिळफाटा संघाचा तब्बल 470 धावांनी धुव्वा उडवला.
श्री कोकण क्रीडा मंडळ आयोजित या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अभिजित सावंत यांच्या हस्ते म्हात्रेपाडा क्रिकेट मैदानावर पार पडले. यावेळी सुधीर पाटील आणि मंडळाचे संचालक धनंजय चाळके उपस्थित होते.
आर. एन. विद्यालयाने 45 षटकांत 6 बाद 550 धावांचा हिमालय उभा केला. यात विवान गुर्जर (ना. 106), सुवीर मेहराने (ना. 100), हृदान गंभीरने (100) तुफान फटकेबाजी केली. तसेच क्रिवोम भांजनने 80 धावा ठोकत सुरेख साथ दिली. या हिमालयावर चढताना दोस्ती फाऊंडेशनचा डाव अवघ्या 80 धावांत आटोपला. विवान तांबेने 24 धावांत 5 विकेट टिपले तर श्लोक जैस्वालने 2 फलंदाज बाद केले.
Comments are closed.