एलॉन मस्कच्या स्पेसएक्सची ऐतिहासिक कामगिरी, अंतराळातून परतणाऱ्या यानाला हवेतच पकडले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उद्योगपती एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ने अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात एक मोठी कामगिरी करत इतिहास रचला आहे. स्पेसएक्स कंपनीचे स्टारशिप अंतराळयान अंतराळातील उड्डाण पूर्ण करून पृथ्वीवर परतत असताना लाँच टॉवरला जोडलेल्या दोन यांत्रिक हातांनी त्याला यशस्वीरीत्या हवेतच पकडले. जगभरातून या तंत्रज्ञानाचे कौतुक होत आहे.

अशा प्रकारे लाँच टॉवरद्वारे परतणाऱ्या स्टारशिप अंतराळयानाला पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या थरारक क्षणाचा व्हिडीओ स्पेसएक्सच्या ‘एक्स’ अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिप 15 ने आजवर कोणत्याही रॉकेटने केली नव्हती अशी कामगिरी केली आहे.

Comments are closed.