बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचा कल्याणमध्ये क्रिकेट धमाका; 7 ते 13 डिसेंबरदरम्यान म्हात्रेपाडा मैदानावर रनोत्सव, विजेत्यांवर पाच लाखांचा वर्षाव, मालिकावीरांना बाईक
चौकार-षटकारांची आतषबाजी, दिवस-रात्र क्रिकेटचा थरार आणि लाखोंच्या बक्षिसांची लयलूट हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कल्याणमध्ये आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेत होणार आहे. 7 ते 13 डिसेंबरदरम्यान म्हात्रेपाडा क्रिकेट मैदान, इस्कॉन मंदिराजवळ, श्री मलंग रोड, नेवाळी नाका, कल्याण येथे ग्रामीण आणि 40 वर्षांवरील खेळाडूंच्या दोन स्वतंत्र स्पर्धा रंगणार आहेत. विजेत्यांवर पाच लाख रुपयांच्या रोख रोख बक्षिसांचा वर्षाव केला जाणार असून स्पर्धेतील दोन्ही सर्वोत्तम खेळाडूंना बाईक दिली जाणार आहे.
या स्पर्धेच्या नियोजनासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीला जिल्हाप्रमुख शरद पाटील, अभिजित अशोक सावंत, संपर्प संघटक मृणाल यज्ञेश्वर, जिल्हा संघटक रवींद्र सुर्वे, जिल्हा समन्वयक सुधीर पाटील, उपजिल्हाप्रमुख नारायण पाटील, भीम मोरे, विजय देसाई, तालुकाप्रमुख सुरेश पाटील, तालुका संघटक वर्षा रसाळ, शहरप्रमुख सुरेश परदेशी, पुणाल ढापरे, शिवाजी जावळे, लहू चाळके, सचिन पाटील, हेमंत चौधरी, नेताजी पाटील, नीरज पुमार, श्री मलंग क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष रामदास ढोणे, धनंजय चाळके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. बैठकीमध्ये स्पर्धेचे स्वरूप, संघ नोंदणी, मैदानाची व्यवस्था, बक्षिसांचे वितरण तसेच स्पर्धेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या क्रिकेटच्या या सप्ताहात ग्रामीण गटाचे सामने सकाळी 9 वाजता, तर 40 प्लस गटाचे सामने सायंकाळी खेळवले जातील. विजेत्याला 1,11,111 रुपये, उपविजेत्याला 66,666 रुपये, तर तृतीय क्रमांकाला 33,333 रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. चौथ्या ते सहाव्या क्रमांकाच्या संघांनाही रोख पारितोषिके दिली जातील. दोन्ही गटांतील मालिकावीरांना प्रत्येकी एक बाईक देऊन गौरविण्यात येणार आहे स्पर्धा कमिशनर प्रमोद म्हात्रे यांच्यासह अभिजित सावंत, धनंजय चाळके आणि शिवसैनिक स्पर्धेच्या आयोजनासाठी मेहनत घेत आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी धनंजय चाळके (8693085555) आणि कृष्णा म्हात्रे (977316957) यांच्याशी संपर्प साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Comments are closed.