प्रेमप्रकरणात अपयश, तरुणाने 11 व्या मजल्यावरून उडी मारुन जीव दिला, डोंबिवलीतील घटना


ठाणे : प्रेमप्रकरणातून एका तरुणाने अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत (डोम्बिव्हली युवा आत्महत्या) घडली. डोंबिवली पश्चिम भागातील सुदामा इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. ऋषिकेश परब असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो इमारतीवरून उडी मारतानाची घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे.

प्रेमप्रकरणात अपयश आल्यानंतर या तरुणाने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिस अधिकचा तपास करत आहेत. अकराव्या मजल्यावरून हा तरुण उडी मारून जीव देतानाचा प्रसंग एका मोबाईलच्या कॅमेरात कैद झाल्याचं दिसतंय.

डोम्बिव्हली युवा आत्महत्या: वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी

सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत या नाट्यमय आत्महत्येचा प्रयत्न सुरू होता अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या तरुणाला आत्महत्या करण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. अखेर या तरुणाने अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

19 वर्षांच्या युवकाची आत्महत्या

मुंबईतील पवईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे. श्रवण विनोद शिंदे असं या युवकाचे नाव आहे. ही घटना पार्कसाईट पोलीस ठाणेच्या हद्दीत आयआयटी मार्केट महात्मा फुलेनगर पवईमध्ये घडली आहे. या घटनेनंतर शेजारी राहणाऱ्या मुलीनेही टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.

पार्कसाईट पोलीस ठाणे हद्दीत आयआयटी मार्केट महात्मा फुले नगर पवई मुंबई येथे राहणारा मुलगा नामे श्रवण विनोद शिंदे (वय 19) याने आपल्या राहत्या घरातील लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार चालू असता साडेतीन वाजता त्याला मृत घोषित करण्यात आलं.

यानंतर त्याच्याच शेजारी राहत असणारी मुलगी दिक्षा दयानंद खळसोडे (वय 19) हिने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कारण तिचे श्रवण बरोबर प्रेम संबंध असल्याची माहिती मिळत आहे. मुलाने गळफास घेतला तेव्हा त्याच्या घरच्यांनी मुलगी दिक्षा हिच्यावर त्याला त्रास दिल्याबद्दलचे आळ लावले. त्याच क्षणी त्या आरोपांना घाबरुन तिने देखील तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

परिस्थितीचं गांभीर्य ओळखून बीट मार्शल एकचे पोलीस हवालदार ठोकळ व बीट स्पेशल ससाने यांनी मुलीच्या पाठोपाठ जाऊन योग्य वेळी दरवाजा उघडला. आता तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.