लोकप्रियता वाढवण्यासाठी जॉर्जिया मेलोनींना पुन्हा मैत्री करायची आहे, ट्रम्प यांचे वक्तव्य
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबद्दल पुन्हा एक वक्तव्य केले आहे. फ्रान्समध्ये आयोजित बैठकीदरम्यान मेलोनी यांनी आपल्यासोबत वारंवार फोटो काढण्याची विनंती केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. आता ट्रम्प म्हणाले आहेत की, मेलोनी आपली घसरत चाललेली लोकप्रियता वाचवण्यासाठी असे करत आहेत. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले हे की, फ्रान्समधील जी-७ बैठकीदरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मला वारंवार सोबत फोटो काढण्याची विनंती केली. इटलीमध्ये त्यांची लोकप्रियता कमी होत आहे, कदाचित याचे कारण हे असू शकते की जेव्हा इराणला आण्विक शस्त्रे मिळवण्यापासून किंवा विकसित करण्यापासून रोखण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी अमेरिकेला साथ देण्यास नकार दिला.
ट्रम्प यांनी पुढे लिहिले की, “आम्हाला इटलीच्या लँडिंग स्ट्रिप्स किंवा धावपट्टीचा वापरही करू दिला नाही, ज्यामुळे लॉजिस्टिक्समध्ये मोठी अडचण निर्माण झाली. हे तेव्हा घडले जेव्हा अमेरिका इटली आणि इतर कथित नाटो मित्र राष्ट्रांच्या सुरक्षेसाठी दरवर्षी अब्जावधी डॉलर्सचे योगदान देते.”
ट्रम्प असेही म्हणाले की, आता जेव्हा अमेरिकेने लष्करीदृष्ट्या इराणचा पराभव केला आहे, तेव्हा आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी त्या पुन्हा मैत्रीचा हात पुढे करू पाहत आहेत.
दरम्यान, याआधीही जेव्हा ट्रम्प यांनी मेलोनी यांच्याबद्दल असाच दावा केला होता, तेव्हा इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली होती. मेलोनी यांनी ट्रम्प यांचे हे दावे पूर्णपणे खोटे ठरवले होते आणि ट्रम्प यांच्या आपल्या मित्र राष्ट्रांसोबतच्या अशा प्रकारच्या वागणुकीबद्दल निराशा व्यक्त केली होती.
Comments are closed.