मीरा रोडमध्ये पावणेतीन कोटींचे कोकेन जप्त

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्य प्रदेशातून राज्यात विक्रीसाठी आणलेल्या अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. डीआरआयच्या मुंबई पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ५४७ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. त्याची किंमत सुमारे २ कोटी ७४ लाख असून याप्रकरणी दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातील इंदोरहून एका बसमधून अमली पदार्थ मुंबईत आणले जाणार असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळाली. त्यानुसार मीरा रोड येथे सापळा रचण्यात आला. २९ ऑगस्टला बसमधून उतरताना दोन परदेशी नागरिकांवर नजर ठेवण्यात आली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झाडाझडती घेतली असता ‘एलव्ही’ अशी खूण असलेली दोन पाकिटे आढळून आली. यामध्ये पांढऱ्या रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ होता. प्राथमिक चाचणी केली असता हा पदार्थ कोकेन आणि मेथाक्वालोन असल्याचे निष्पन्न झाले.

Comments are closed.