डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान; निष्ठेची मशाल घरोघरी पोहोचवणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

डोंबिवली शहरातील ज्येष्ठ व कट्टर शिवसैनिक तसेच माजी पदाधिकारी यांच्या सल्लागार मंडळाच्या झालेल्या बैठकीत डोंबिवलीमधील ७० ज्येष्ठ शिवसैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक शिवसैनिकांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच संघटनात्मक वाढ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धारही शिवसैनिकांनी केला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख विलास म्हात्रे यांनी शहर शाखेतर्फे सर्वांचे स्वागत केले. शहरप्रमुख सुरेश परदेशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. डोंबिवलीतील जुन्या व निष्ठावंत शिवसैनिकांना सल्लागार मंडळात स्थान दिले असून त्यांच्या अनुभवाचा फायदा विविध उपक्रम राबवण्यासाठी होणार आहे. निष्ठेची मशाल घराघरापर्यंत पोहोचवण्यात येईल, असा निश्चय शिवसैनिकांनी याप्रसंगी केला.

शहर संघटक प्रियांका विचारे, उपशहर संघटक लक्ष्मी कांबळी, सुरेखा सावंत, निशा रेड्डीज, विधानसभा युवाधिकारी आदित्य पाटील, शाखाप्रमुख अनिल विश्वकर्मा यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे यांनी केले. शहरप्रमुख सुरेश परदेशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments are closed.