विधानभवनातील मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंच्या ओझरत्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा, लिफ्टमध

Maharashtra Assembly budget Session 2026: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनाच्या लिफ्टमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) आणि ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची भेट झाली होती. या भेटीची काल दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. काहीवेळ हे दोघे लिफ्टमध्ये एकमेकांसोबत गप्पा मारत होते. यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा सुरु होती. मात्र, या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. या चर्चेचा तपशील आता समोर आला आहे. (Maharashtra Politics)

काल मिलिंद नार्वेकर हे आधी विधान भवनाच्या लिफ्टमध्ये गेले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे सुद्धा त्याच लिफ्टमध्ये आले. या दोघांनी एकमेकांना पाहताच अभिवादन केले.  मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वरळी डोम येथे अजित पवारांच्या शोकसभे.संदर्भात अगदी दीड-दोन मिनिटे चर्चा झाली  मिलिंद नार्वेकर यांनी अजित पवार यांच्या वरळी डोम येथील शोकसभेचा आयोजन सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी नियोजनबद्ध केल्याचे म्हटले. या शोकसभेला अदानी,अंबानी आले, हे विशेष असेही मिलिंद नार्वेकर म्हणाले. यानंतर अजित पवार यांच्या शोक प्रस्तावपर चर्चेदरम्यान सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणाबाबतही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी तिसरा दिवस आहे. येत्या 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात महाराष्ट्राचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प मांडतील. यंदाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रथेप्रमाणे दोन्ही सभागृहातील दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. या शोक प्रस्तावावरील चर्चेत बोलताना विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही सभागृहातील अनेक नेत्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला होता.

Shambhuraj Desai VS Anil Parab : एकनाथ शिंदेंच्या खात्यावरुन अनिल परब- शंभूराज भिडले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा अधिवेशनापुरता त्यांच्याकडील काही खात्यांची जबाबदारी शिवसेनेतील अन्य मंत्र्यांवर सोपवली होती. यावरुन मंगळवारी विधानसभेत रणकंदन झाले. अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई एकमेकांशी भिडल्याचे दिसून आले. सभागृहामध्ये अनिल परब यांनी आपलं म्हणण मांडताना म्हटलं की, या सभागृहाचे नियम या सभागृहाच्या परंपरा आणि सभागृह कसा चालवणं हे आपल्या अधिकार कक्षात येतं, ज्यावेळी विधानसभेचं अधिवेशन चालतं त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बऱ्याच वेळेला बिझी असतात त्यांच्याकडे वेगवेगळी जबाबदारी असते आणि ते आपल्या खात्याचा कारभार दुसऱ्यांकडे देतात. आम्ही आपल्याकडे मागणी करतो, कुठल्या खात्याचे मंत्री आणि ज्यावेळेला राज्यमंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही मान्य करत होतो, मुख्यमंत्र्यांचे अधिकार दुसऱ्या मंत्रांना दिले आहेत, ते उत्तर देत आहेत, परंतु आता त्या खात्याचा राज्यमंत्री आज आहे आणि राज्यमंत्री असताना देखील मंत्री जर येऊन मुख्यमंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांचे विषय जर हाताळत असतील, तर योग्य आहे का?, असा सवाल अनिल परब यांनी विचारला होता. अखेर एकनाथ शिंदेंनी स्वत: सभागृहात येऊन या वादात हस्तक्षेप केला होता.  त्यांचा जो काही बॅकलॉग राहिलेला आहे, मी आत्ता शंभूराज देसाई यांना सांगितलेला आहे, जे तुमचे प्रश्न आहेत, जे तुमचे प्रश्न राहिलेले आहेत, ज्या बैठका घ्यायचा आहेत, त्या सर्व घ्या आणि एका महिन्यामध्ये त्याची सर्व पुरता करा, मी स्वतः यामध्ये लक्ष घालेन, आणि एकच आहे. यामध्ये गैरसमज कोणाचा नसावा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

सुधीर मुनगंटीवारांचा सभागृहात आक्रमक आवेश, प्रश्नांच्या सरबत्तीने योगेश कदमांची उडाली भंबेरी, लक्षवेधीवेळी नक्की काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.