एकनाथ ‘भाईं’नी सुहास ‘अण्णां’ची ताकद वाढवली, नाशिकमध्ये मोठी जबाबदारी; शिवसेनेत प्रथमच ‘या’ पदा
सुहास म्हणाला: शिवसेनेच्या (Shiv Sena) संघटन रचनेत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या आदेशानुसार नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांची ‘प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख, नाशिक जिल्हा’ या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
Shiv Sena: शिवसेनेत प्रथमच निर्माण झालेले पद
शिवसेनेच्या संघटन रचनेत प्रथमच “प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख” हे पद निर्माण करण्यात आले असून, हे पद सर्व जिल्हा प्रमुखांच्या वरच्या स्तरावरचे मानले जात आहे. यामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे आगामी नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना अधिक बळकट करणे, रणनीती आखणे व कार्यपद्धती एकसंध करणे, असे आहे.
Suhas Kande: मुंबईत झाली नियुक्तीची घोषणा
मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती अधिकृतपणे घोषित करण्यात आली. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी, आणि राम रेपाळे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
Suhas Kande Reaction: आमदार सुहास कांदे यांची प्रतिक्रिया
याबाबत आमदार सुहास कांदे म्हणाले की, “शिवसेनेच्या प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख या जबाबदारीसाठी माझी निवड केल्याबद्दल मी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आणि एकनाथ शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानतो. मंत्री दादाजी भुसे व उदय सामंत यांचेही आभार. ही नियुक्ती केवळ पद नाही, तर प्रत्येक शिवसैनिकाच्या त्यागाचा आणि निष्ठेचा सन्मान आहे. नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा गड आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा आधार घेत, तळागाळातील प्रत्येक शिवसैनिकाशी थेट संपर्क ठेवत आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा झेंडा उंच फडकवू. शिवसेना ही सत्ता नव्हे, तर सेवा आहे आणि सेवा हीच माझी खरी ओळख राहील. सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने नाशिक जिल्हा हे शिवसेनेच्या संघटनशक्तीचे आदर्श उदाहरण बनवू,” असे त्यांनी म्हटले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.