BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं ‘हॉटेल पॉलिटीक्स’; निकाल लागताच नेमकं काय घडलं?

मराठी BMC Election Result 2026: देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल 25 वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation Election Result 2026) भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावलीय. 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असल्याचं स्पष्ट झालं. मुंबई  महापालिकेची निवडणूक 9 वर्षांनी पार पडली. या पालिकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला. सत्ताधारी भाजप, शिंदेसेना एकसंघपणे मैदानात उतरली. मात्र, महाविकास आघाडीतील उद्धवसेनेने मनसेसोबत जवळीक साधल्याने काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली. यामुळे निवडणुकीत तिरंगी लढत झाली. यात सर्वाधिक जागा जिंकून भाजप मोठा पक्ष ठरला. तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी मतदारांची साथ मिळाल्याचेही निकालातून समोर आले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 90 जागांवर उमेदवार दिले होते. यामध्ये 29 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेने विजय मिळवला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी एक खास प्लॅन केला आहे.  निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. सत्तास्थापनेच्या दिवसापर्यंत एका फाईल्ह स्टार हॉटेलमधे नवनिर्वाचित नगरसेवकांना ठेवले जाणार आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक भाजपचा स्ट्राईक रेट राहिला. भाजपनंतर शिवसेना ठाकरे गटाचा सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे. (मराठी BMC Election Result 2026)

शिंदेंच्या विजयी उमेदवारांची यादी- (मराठी Winning Candidate)

  1. प्रभाग १ – रेखा यादव
  2. प्रभाग 4 – मंगेश पांगारे
  3. प्रभाग 5 – संजय घाडी
  4. प्रभाग 6 – दिक्षा कारकर
  5. प्रभाग 11 – डॉ. अदिती खुरसंगे
  6. प्रभाग 18 – संध्या दोशी
  7. प्रभाग 42 – धनश्री भरडकर
  8. प्रभाग ५१ – वर्षा टेमवलकर
  9. प्रभाग 78 – सोफी अब्दुल जब्बार
  10. प्रभाग 86 – रितेश राय
  11. प्रभाग 91 – सगुण नाईक
  12. प्रभाग 119 – राजेश सोनावळे
  13. प्रभाग 125 – सुरेश आवळे
  14. प्रभाग 133 – निर्मिती कानडे
  15. प्रभाग 142 – अपेक्षा खांडेकर
  16. प्रभाग 146 – समृद्धी काते
  17. प्रभाग 147 – प्रज्ञा सदाफुले
  18. प्रभाग 148 – अंजली नाईक
  19. प्रभाग १५६ – अश्विनी माटेकर
  20. प्रभाग 160 – किरण लंगे
  21. प्रभाग 161 – विजेंद्र शिंदे
  22. प्रभाग 163 – शैला लांडे
  23. प्रभाग 166 – मीनल संजय तुर्डे
  24. प्रभाग 175 – सातमकर मंगेश
  25. प्रभाग 178 – अमेय घोले
  26. प्रभाग 180 – तृष्णा विश्वासराव
  27. प्रभाग 188 – भास्कर शेट्टी
  28. प्रभाग 197 – वनिता नरवणकर
  29. प्रभाग 209 – यामिनी जाधव

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर…

आणखी वाचा

Comments are closed.