कावड यात्रेकडे पाठ फिरवणाऱ्यांचं पालथं झालं, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

मराठी : अडीच वर्षात आमदार संतोष बांगरला (Santosh Bangar) 2 हजार 600 कोटी रुपये निधी दिला असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकेनाथ शिंडे (एकनाथ शिंदे) यांनी केलं. महाविकास आघाडी सरकारनं अडीच वर्षात तीन कोटी रुपये दिले होते असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांच्याकडे पेन नव्हते, इकडे दोन दोन पेन असल्याचे ते म्हणाले. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केल्याचे ते म्हणाले. ज्यांनी कावड यात्रेकडे पाठ फिरवली त्यांचं पालथ झालं असे म्हणत उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंनी सडकून टीका केली. ते हिंगोलीत बोलत होते.

जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणार

दुसरी इनिंग आता सुरु झाली आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. निवडणुकपूर्वी महाविकास आघाडीने मंत्रिमंडळ तयार केलं होतं, असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला. बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले हे विचार बघण्यासाठी हा जागर पाहण्यासाठी हिंमत लागते.

आमच्या सरकारनं शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं

उठाव केला तेव्हा एका फोनमध्ये संतोष बांगर सोबत आले आणि ऑपरेशन तक्त पलटी करुन टाकलं. एक बार मैने कमिटमेंट कर ली तो मैं खुदकी भी नहीं सुनता असे ही एकनाथ शिंदे म्हणाले. लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही, वीज बिल माफ करतो म्हणून काँग्रेस सत्तेत आले आणि निवडून आल्यावर शेतकऱ्यांना वीज बिल दिलं. आमच्या सरकारनं शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.  आपण सरड्या सारखे रंग बदलणारे नाहीत असेही ते म्हणाले.

कावड यात्रा म्हणजे मिरवणूक नाही तर सनातन धर्माचं प्रतीक

कावड यात्रा म्हणजे मिरवणूक नाही तर सनातन धर्माचं प्रतीक आहे. महादेवाचा उत्सव कावड यात्रा देशभर गाजत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. संतोष बांगर यांच्या कावड यात्रेची कीर्ती देशभर पसरली आहे. महाराष्ट्र संतांची भूमी आहे, या संतानी भक्तीची शिकवण दिली आहे. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान वर असते असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हिंदू माणूस कधीही दहशतवादी नसतो

अनेकांना ही कावड यात्रा बघून अॅलर्जी झाली असेल, पोटदुखी झाली असेल असे एकनाथ शिंदे म्हणाले. भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांना जनता जागा दाखवेल. हा हिंदुत्वाचा जनसागर आहे शिव शंकराने तिसरा डोळा उघडला आहे. शिवरायांचा भगवा, वारकऱ्यांचा भगवा, रामचंद्राचा भगवा आहे. हा दशहतवादाचा आहे का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. भगव्याची अॅलर्जी असणाऱ्या लोकांनी स्वतःला भारतीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही. कुठल्याही जाती पातीचा असूद्या तो आपला आहे परंतू, पाकिस्तानचे गुणगान गाणारा आपला दुश्मन आहे असे बाळासाहेब म्हणायचे. हिंदू माणूस कधीही दहशतवादी नसतो.  धर्माला तुम्ही बदनाम केलं आहे. शिवभक्त तुम्हाला तुमची जागा दाखवणार असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.

https://www.youtube.com/watch?v=4qzcor2xpsu

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Shirsat : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार का? माझा कट्ट्यावर मंत्री संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं

आणखी वाचा

Comments are closed.