ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वे

मराठी on Uddhav Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर भाजप (BJP) आणि शिवसेना ठाकरे गटाची (Shiv Sena UBT) जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर ठाकरे गटाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील फडणवीस यांची तीन वेळा भेट घेतली आहे. तसेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आलाय. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

एकनाथ शिंदे म्हणाले की, स्वार्थासाठी महाविकास आघाडी एकत्र आली होती. लोकसभेत फेक नेरेटिव्ह सेट केला आणि  लोकांच्या पाठीत खंजीर खुपसला. नागरिकांनी विधानसभेला त्यांना त्यांची जागा दाखवली. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो, मला शिव्या शाप आणि आरोप करण्याशिवाय त्यांनी दुसरे काही केले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप केले. तू  राहशील नाही तर मी तरी राहिन, असे बोलले, मात्र आता काय जादू झाली ते आपण पाहिलंय, सरडे रंग बदलतात मात्र एवढ्या फास्ट बदलणारे मी पाहिले नाहीत, असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला.

सरकार देश्मुख कुटुंबियांच्या पाठीशी

ते पुढे म्हणाले की, बीड प्रकरणात एसआयटी स्थापन केली आहे. सखोल तपास सुरू आहे. संतोष देशमुख यांचा निर्घुण खून केला आहे. चुकीला माफी नाही, या प्रकरणाशी संबधितांना फासावर लटकवेपर्यंत सरकार पावलं उचलेल. सरकार देश्मुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे. आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाई केली जाईल. आरोपी कितीही मोठा असला तरी त्याचे कोणासोबत कितीही लागेबंदे असले तरी त्याला सोडणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हटले आहे.

त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

ज्यांनी शिवसेनाप्रमुख प्रमुखांचे विचार पायदळी तुडवले, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेईमानी केली. ज्यांनी काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी गद्दारी केली. त्या उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकामध्ये जाण्याचं आणि पाय ठेवण्याचा नैतिक अधिकार नाही, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केले. याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, रामदास कदम अत्यंत योग्य बोलले आहेत. ठाकरेंनी वक्तव्य केलं की, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना कार्यक्रमाला बोलवणार नाही. अरे कार्यक्रम कोणाचा आहे? स्मारक कोण बांधतंय? ते सरकार बांधतयं, त्यामुळे बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? मग ते कोणाला लागू होतं? कोण काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलं? स्वत:च्या स्वार्थासाठी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी कोणी विचार सोडले? त्यामुळे त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

आणखी वाचा

Ramdas Kadam : उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरेंना कुठं ठेवायचं हे देवेंद्र फडणवीसांनी ओळखावं, रामदास कदमांचा ठाकरेंवर हल्लाबोल

अधिक पाहा..

Comments are closed.