एकनाथ शिंदेंनी शेवटच्या क्षणी वेगळाच पत्ता काढला, जागावाटपासाठी रात्री तीनपर्यंत राजकीय खलबतं

महायुतीची जागावाटप : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीत (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) भाजप (BJP) आणि महायुतीने (MahaYuti) दणदणीत विजय मिळवत आपली विजयी घोडशर्यत राखले ठेवली आहे. तर बऱ्याच ठिकाणी अपयश देखील आल्याचे चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता आगामी महानगरनगरपालिकाकडे महायुतीने लक्ष केंद्रित केलं असून त्या अनुषंगाने चर्चा आणि बैठकांचं सत्र बघायला मिळत आहे. अशातच पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी शिवसेना आमदार आणि नगरसेवकांची कालावधी, सोमवारी विशेष बैठक घेण्यात आली होती. या बैठकित आमदारांना मतदारसंघ आणि नगरसेवकांना निवडणुकीपर्यंत वाॅर्ड न सोडण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहे.

तसेच, शिवसेना भाजप यांच्यातील जागा वाटप हे अंतिम टप्यात असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित युती आणि जागा वाटपाची घोषण़ा होईल, अशी देखील माहिती आहे.

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेसह प्रमुख नेत्यांमध्ये रात्री तीनपर्यंत राजकीय खलबतं

दरम्यानया निवडणुकीतही शिवसेनेकडून जास्त जागांपेक्षा निवडून येणाऱ्या जागाचं घेण्याचे धोरणं ठरले असल्याची माहिती आहे. तर तिकिट वाटप करताना इच्छुक उमेदवाराच्या कामाच्या जोरावर त्याला उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. तरीही इच्छुक उमेदवारांकडून पक्षात अंतर्गत मंत्री आमदार यांच्याकडून जोरदार सेटींग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील 29 महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा झालीय. महायुतीतील जागावाटप आज किंवा उद्या जागा वाटप निश्चित होणार, अशी माहिती विश्वसनीय सूत्रेni दिलीय. सोमवारीमध्यरात्री 3 वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमंत्री उदय सामंत, आशिष शेलार, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम त्यासोबतच राहुल शेवाळे यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती आहे. तर 29 महापालिकांमध्ये महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

आणखी वाचा

Comments are closed.