लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री: नीलम गोऱ्हे


मराठी CM: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना आता महायुतीमध्ये (Mahayuti) मुख्यमंत्रीपदावरुन वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांनी (Ajit Pawar) पुढच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय पूजा करावी, अशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे (मराठी) यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याच्या शिवसेनेच्या आकांक्षांना नवे धुमारे फुटले आहेत. शिंदे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरु झाली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मंगळवारी नीलम गोऱ्हे यांच्या ‘दाही दिशा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेत. पण लाडकी बहीण योजनेमुळे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. राजकारणात महिलांना स्थान मिळाले असले तरी त्यांच्या सुरक्षेचे आणि सक्षमीकरणाचे काम अजून बाकी आहे. महिलांना आरक्षण मिळाले पण संरक्षण नाही.  त्यासाठीचा संघर्ष अजून सुरु आहे, असे वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमा निर्मितीसाठी लाडकी बहीण योजनेचा पुरेपूर वापर करण्यात आला होता. हाच धागा पकडत आता नीलम गोऱ्हे यांनी, ‘एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत’, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात कुजबुज रंगली आहे. गोऱ्हेंच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हेंच्या ‘दाही दिशा’ या पुस्तकाचे कौतूक केले. हे पुस्तक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा अनेक पैलूंना स्पर्श करणारे आहे. हे पुस्तक केवळ महिलांसाठी नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक आहे आणि महिलांच्या समस्यांबाबत सर्व बाजूंनी विचार करायला लावणारे असल्याचे गौरवोद्गार एकनाथ शिंदे यांनी काढले.

मराठी: गुवाहाटीची खरी कथा मला विचारुनच लिहावी लागेल: एकनाथ शिंदे

शिवसेनेत आम्ही उठाव करुन गुवाहाटीला गेलो. तिथून परत आलो. या सगळ्याची वरवरची कहाणी सर्वांना माहिती आहे. पण पुस्तक लिहायचे झाल्यास खरी कथा मलाच माहिती आहे. त्यासाठी माझ्याशी बोलावे लागेल, असे वक्तव्य या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी केले.

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीस पुन्हा केंद्रात जाण्याची चर्चा, अजित पवार मुख्यमंत्री होवोत, ‘त्या’ नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

आणखी वाचा

Comments are closed.