शिंदेंच्या शिवसेनेनं टायमिंग साधलं, महापालिकेसाठी स्टार प्रचारकांची फौज तयार, 40 नावं जाहीर

मुंबई : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संजय मोरे यांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे “स्टार प्रचारक” म्हणून 40 जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान असलेल्या आमदार भावना गवळी यांना महापालिका स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आलं आहे.

शिवसेना स्टार प्रचारकांची यादी

  1. एकनाथ शिंदे ,मुख्य नेते व उप-मुख्यमंत्री
  2. रामदास कदम, नेते
  3. गजानन किटीकरनेते
  4. आनंदराव अडसूळनेते
  5. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार आणि शिवसेना संसदीय गट नेते
  6. प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री
  7. डॉ.निलमताई गुन्हेनेत्या
  8. मीनाताई कांबळी, नेत्या
  9. गुलाबराव पाटील, नेते व मंत्री
  10. आजोबा सर भुसे, उपनेते आणि मंत्री
  11. उदय सामंत, उपनेते आणि मंत्री
  12. शंभूराज देसाई, उपनेते आणि मंत्री
  13. संजय राठोडमंत्री
  14. संजय शिरसाटप्रवक्ते व मंत्री
  15. भरतशेठ गोगावले, उपनेते आणि मंत्री
  16. प्रकाश आबिटकरमंत्री
  17. प्रताप सरनाईकमंत्री
  18. आशिष जयस्वालराज्यमंत्री
  19. योगेश कदम, राज्यमंत्री
  20. दिपक केसरकरप्रवक्ते व आमदार
  21. श्रीरंग बारणे, उपनेते व खासदार
  22. धैर्यशील माने, खासदार
  23. संदीपान भुमरेखासदार
  24. नरेश म्हस्केखासदार
  25. रवींद्र वायकरखासदार
  26. मिलिंद देवरा, खासदार
  27. दिपक सावंत, उपनेते व माजी मंत्री
  28. शहाजी बापू पाटील, उपनेते व माजी आमदार
  29. राहुल शेवाळे, उपनेते व माजी खासदार
  30. मनीषा कायंदेसचिव व आमदार
  31. निलेश राणे, आमदार
  32. संजय निरुपमप्रवक्ते
  33. राजू वाघमारे, प्रवक्ते
  34. ज्योती वाघमारे, प्रवक्ते
  35. पूर्वेश सरनाईक, युवासेना कार्याध्यक्ष
  36. राहुल लोंढे, युवसेना सचिव
  37. अक्षयमहाराज भोसले, शिवसेना प्रवक्ते व अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सैन्य
  38. समीर काझी, कार्याध्यक्षअल्पसंख्याक विभाग
  39. शायना एन.सी., राष्ट्रीय प्रवक्त्या
  40. गोविंदा अहुजामाजी खासदार

शिवसेनेनं टायमिंग साधलं

एकीकडं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती जाहीर झाल्याचं आज जाहीर केलं आहे. नेमक्या याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे यांनी लोकशाहीत युती आघाडी होत असतात. काही जणांची युती जनतेसाठी होते, जशी आमची महायुती आहे. आता झालेल्या युती सत्तेसाठी, खुर्चीसाठी, स्वार्थासाठी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हणत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.