कुर्डूवाडीत ठाकरेंच्या सेनेला रोखण्यासाठी एकनाथ शिंदे व शरद पवार गट एकत्र; निवडणुकीच्या पार्श्व


कुर्डूवाडी: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Elections) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकीसाठी (Elections) जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, कुर्डूवाडी नगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने भगवा फडकवत ठेवणाऱ्या उद्धव ठाकरे (Shivsena UBT) यांच्या शिवसेना ठाकरे गटाला  (Shivsena UBT) हटविण्यासाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Sharad Pawar) आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena मराठी) एकत्र आले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून धनंजय डिकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डवाडी नगरपालिकेवर ठाकरे गटाचा भगवा स्वबळावर फडकत आहे. ठाकरे गटाकडून सत्ता काढून घेण्यासाठी आता नगरपालिकेत शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्रित येत जागावाटप पूर्ण केले आहे.

दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे राष्ट्रवादी आणि आठवल्यांची रिपब्लिकन पक्ष यांनी एकत्रित येत स्वतंत्र पॅनल उभे करण्याची तयारी केली आहे. कुर्डूवाडी नगरपालिकेत कोणताही जनाधार नसलेली भाजपही आता स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून कुर्डूवाडी नगरपालिकेवर सत्ता ठेवणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी आघाड्या पराभूत करणार का हेच पाहण्यासारखे असणार आहे.

Shivsena UBT and Shivsena Shinde Group: कोकणात शिंदे अन् ठाकरे गटाची युतीसाठी गुप्त बैठक

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीत शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) आणि ठाकरे गट (Shiv Sena UBT) एकत्र येण्याची चर्चा रंगली होती. तसेच कणकवली शहरात याबाबत गुप्त बैठक झाली होती. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, तसेच स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर, आणि सतीश सावंत हे उपस्थित होते. या बैठकीत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही एकत्र येण्याची चर्चा झाली होती. त्यामुळे कोकणात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येणार असल्याचे सांगितले जात होता. परंतु याच बैठकीवर आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सिंधुदुर्गमधील कणकवली नगरपंचायत निवडणुकीत (Kankavali Nagarpanchayat Election 2025) पक्षाने शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्यासंबंधीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्गमधील कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी (Nagarpanchayat Election 2025) ‘शहर विकास आघाडी’ म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर ठेवला. मात्र उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या समीकरणाची माहिती घेतल्यानंतर सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली.

आणखी वाचा

Comments are closed.